Rahul Dravid Engaged in Heated Argument with Auto Driver Video: भारताचे महान फलंदाज आणि टीम इंडियाचे टी-२० विश्वचषक विजेते माजी प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हीडिओमध्ये द्रविड भर रस्त्यात त्यांची कार तपासत रिक्षा चालकाशी वाद घालताना दिसत आहेl. पण नेमकी घटना काय घडली आहे, जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राहुल द्रविड यांच्या कारची व एका लोडिंग ऑटो रिक्षाची बंगळुरूमध्ये धडक झाली. यानंतर द्रविड लोडिंग करणाऱ्या रिक्षाचालकाशी वाद घालत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये कायम आपल्या शांत स्वभावासाठी ओळखले जाणारे द्रविड वैतागलेले दिसले. ही घटना मंगळवारी संध्याकाळची आहे. व्हीडिओमध्ये द्रविड आपली मूळ भाषा कन्नडमध्ये ड्रायव्हरशी वाद घातलाना दिसत आहेत. रस्त्यावरून जाणाऱ्या एका प्रवाशाने या घटनेचा व्हीडिओ घेतला आहे.

लोडिंग ऑटो धडकल्यानंतर राहुल द्रविडच्या कारचं थोड नुकसान झाल्याने द्रविड लोडिंग रिक्षाच्या चालकावर संतापताना दिसला. व्हिडीओमध्ये राहुल द्रविड स्पष्टपणे आपली नाराजी व्यक्त करत असून ऑटोचालकाशी चर्चा करताना दिसत आहे. राहुल द्रविड यादरम्यान बोलत असताना ब्रेकचा उल्लेखदेखील केला. पण या रिक्षा आणि कारच्या धडकेदरम्यान कोणालाही दुखापत झालेली नाही, दुपारी ४ च्या दरम्यान ही घटना कनिंगहम रोड बंगळुरूमध्ये घडली.

समोर आलेल्या माहितीनुसार, लोडिंग ऑटोने राहुल द्रविडच्या कारला मागून धडक दिली, ज्यामुळे द्रविड वैतागलेले दिसले. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, लोडिंग ऑटो त्याच्या कारला धडकल्यानंतर राहुल द्रविड खाली उतरून त्याच्या कारची पाहणी करत असल्याचे दिसत आहे. रिक्षाचालकही द्रविडबरोबर वाद घालत घडलेली घटना सांगत आहे. या घटनेदरम्यान माजी भारतीय क्रिकेटपटू आणि ऑटोचालक यांच्यात किरकोळ बाचाबाचीही झाली. या घटनेच्या संदर्भात अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

राहुल द्रविडचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी बऱ्याच कमेंट्स केल्या आहेत. काही जणांनी ‘इंदिरानगर का गुंडा’, ‘इंदिरानगर का गुंडा व्हाईबस’, ‘द्रविडला कोणीच कसं ओळखलं नाही’, ‘ड्रायव्हर कोणाशी वाद घालतोय त्याला कळतंय का’, अशा पद्धतीच्या विविध कमेंट्स केल्या आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul dravid gets into argument with auto driver after minor accident in bengaluru video goes viral bdg