Rahul Dravid Birthday Celebration: टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा बुधवारी ५० वा वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसानिमित्त जगभरातून चाहते त्याला शुभेच्छा संदेश पाठवत होते. अशा परिस्थितीत टीम इंडियाचे सदस्य कसे मागे राहणार होते. वनडे मालिकेतील दुसरा सामना खेळण्यासाठी कोलकात्यात पोहोचलेल्या भारतीय संघाने हॉटेलमध्ये द्रविडसाठी आधीच सरप्राईज प्लॅन केला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोलकातामध्ये राहुलच्या वाढदिवसाचा केक कापण्यात आला. हॉटेलमध्ये चेक-इन करताच टीमने प्रथम द्रविडचा ५० वा वाढदिवस संस्मरणीय बनवला. राहुल द्रविडच्या वाढदिवसाच्या पार्टीचा व्हिडिओ बीसीसीआयच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे. गुवाहाटीहून निघाल्यानंतर टीम इंडिया कोलकाता येथील हॉटेलमध्ये पोहोचल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

रुममध्ये चेक इन करण्यापूर्वीच राहुल द्रविडच्या वाढदिवसानिमित्त केक कटिंग सेरेमनी आयोजित करण्यात आली होती. व्हिडिओमध्ये सर्व खेळाडू त्यांच्या सुटकेससह दिसत आहेत. राहुल द्रविडनेही संघाचे हे प्रेम स्वीकारून केक कापला आणि सर्व सहकाऱ्यांसोबत शेअर केला. भारताला आता गुरुवारी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर दुसऱ्या वनडे सामन्यात श्रीलंकेचा सामना करायचा आहे.

हेही वाचा – Sourav Ganguly Statement: सचिन-विराटच्या तुलनेवर गांगुलीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘कोणीही अशी शतके…’

रोहित शर्माला हा सामना जिंकून मालिकेत २-० अशी अजेय आघाडी मिळवायची आहे. मात्र, श्रीलंकेचा संघ भारताला ही मालिका इतक्या सहजासहजी जिंकू देणार नाही. पराभवानंतरही दासुन शनाकाचा संघ ३०६ धावा करण्यात यशस्वी ठरला होता. अशा स्थितीत ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर शेजारी देशाला हलक्यात घेण्याची चूक रोहित शर्मा करणार नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul dravid got a surprise as soon as he reached kolkata watch the video of birthday celebration vbm