India vs New Zealand, 1st World Cup 2023 Semifinal: विश्वचषक २०२३चा पहिला सेमीफायनल सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. हा सामना बुधवार १५ नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाने अद्याप एकही सामना गमावलेला नाही. सलग ९ सामने जिंकून टीम इंडियाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे, त्यामुळे राहुल द्रविड आणि संघातील खेळाडू कोणतीही चूक करू इच्छित नाहीत. याच कारणामुळे राहुल द्रविड आणि इतर प्रशिक्षक मुंबईत पोहोचताच ते टीमबरोबर हॉटेलमध्ये नाही तर वानखेडे स्टेडियममध्ये खेळपट्टीची पाहणी करण्यासाठी गेले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बंगळुरूमध्ये नेदरलँड्सचा पराभव करून संघ जेव्हा मुंबईला रवाना झाला तेव्हा संघासाठी आजचा दिवस हा विश्रांतीचा होता. मात्र, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड थेट कामाला लागले आणि ते सपोर्ट स्टाफसह खेळपट्टीच्या पाहणीसाठी वानखेडे स्टेडियमवर गेले. द्रविड, फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड आणि गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे १५ नोव्हेंबर रोजी भारत विरुद्ध न्यूझीलंड क्रिकेट विश्वचषक उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी खेळपट्टीची पाहणी करण्यासाठी थेट स्टेडियमवर गेले.

सध्याच्या स्पर्धेत द्रविड आणि इतर संघातील सदस्य हे नेहमीप्रमाणे खेळपट्टीची पाहणी करायला गेले. गेल्या आठवड्यात कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर देखील असेच दृश्य दिसले, जेव्हा द्रविड भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यासाठी कोलकात्यात उतरल्यानंतर थेट खेळपट्टी पाहण्यासाठी ईडन गार्डन्सवर पोहोचला होता.

हेही वाचा: Rahul Dravid: न्यूझीलंडविरुद्धच्या सेमीफायनलआधी प्रशिक्षक राहुल द्रविडचे सूचक विधान; म्हणाला, “दबाव असला तरी उत्तर द्यायचे…”

वानखेडे स्टेडियम मुंबईच्या खेळपट्टीचा अहवाल

विश्वचषक २०२३चा सेमीफायनल सामना मुंबईच्या वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. वानखेडेची खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्त मानली जाते. मुंबईच्या या मैदानावर चौकार-षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळते. तसेच, या खेळपट्टीवर गोलंदाजांना उसळी असल्यामुळे चेंडू बॅटवर चांगला येतो आणि धावा काढणे खूप सोपे जाते.

आयसीसी विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताचा विक्रम

२०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीसाठी पात्र ठरलेला भारतीय संघ पहिला संघ होता. टीम इंडियाने साखळी टप्प्यात अपराजित राहून पूर्ण केला. यासह भारत आठव्यांदा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला आहे. या उपांत्य फेरीत पोहचताच भारताने न्यूझीलंडची बरोबरी केली आहे. न्यूझीलंडने पण आठ वेळा उपांत्य फेरी गाठली आहे. मात्र, या बाबतीत भारत अजूनही ऑस्ट्रेलियाच्या मागे आहे. बाद फेरीत भारताचा विक्रम कसा राहिला आहे, याविषयी जाणून घेऊ या.

हेही वाचा: World Cup 2023: गौतम गंभीरने रोहित शर्माच्या कॅप्टन्सीची सांगितली खास वैशिष्ट्ये; म्हणाला, “भारताच्या इतर कर्णधारापेक्षा तो…”

भारताने किती वेळा आयसीसी विश्वचषक उपांत्य फेरी गाठली आहे?

एकदिवसीय विश्वचषकाच्या मागील १२ आवृत्त्यांपैकी भारताने ७ वेळा उपांत्य फेरी गाठली आहे.

भारताने आयसीसी विश्वचषकातील किती सेमीफायनल जिंकल्या आहेत?

भारताने आयसीसी विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीतील सातपैकी तीन सामने जिंकले आहेत.

भारताने शेवटच्या वेळी आयसीसी विश्वचषक उपांत्य फेरी कधी जिंकली होती?

भारतीय संघाने शेवटची २०११ मध्ये एकदिवसीय विश्वचषक उपांत्य फेरी जिंकली, त्यावेळी त्यांनी पाकिस्तानला पराभूत करत दुसऱ्यांदा विजेत्यापदावर नाव कोरले होते.

कोणत्या संघाने सर्वाधिक आयसीसी विश्वचषक उपांत्य फेरी खेळली आहे?

ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक एकदिवसीय विश्वचषक उपांत्य फेरी (८) खेळली आहे.

कोणत्या संघाने सर्वाधिक आयसीसी विश्वचषक उपांत्य फेरी जिंकली आहे?

ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक एकदिवसीय विश्वचषक उपांत्य फेरी (६) जिंकली आहे.

आयसीसी विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताची कामगिरी

आवृत्ती विरोधी संघपरिणाम
१९८३इंग्लंडविजय
१९८७इंग्लंडपराभव
१९९६श्रीलंकापराभव
२००३केनियाविजय
२०११पाकिस्तानविजय
२०१५ऑस्ट्रेलियापराभव
२०१९न्यूझीलंडपराभव
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul dravid inspected the pitch as soon as he reached mumbai how is indias record in the semifinal find out avw