Rahul Dravid in IPL 2025: भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ टी-२० विश्वचषक २०२४ नंतर संपुष्टात आला. पण आता राहुल द्रविड पुन्हा एकदा प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. इंडियन प्रीमियर लीग २०२५ (IPL 2025) मध्ये राहुल द्रविड प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसू शकतात अशी चर्चा आहे. याआधीही द्रविड आयपीएल संघांच्या कोचिंग सेटअपचा भाग होता. दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि राजस्थान रॉयल्सशी (RR) संघाच्या कोचिंगचा ते भाग होते.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून ५१ वर्षीय राहुल द्रविड यांच्या नावाची चर्चा आहे. टाइम्सने एका स्त्रोताच्या हवाल्याने सांगितले की, “राजस्थान रॉयल्स आणि राहुल द्रविड यांच्यात चर्चा सुरू आहे. याबाबतची घोषणा लवकरच केली जाणार आहे.” राहुल द्रविडचे राजस्थान रॉयल्सशी जुने नाते आहे. संघाचा कर्णधार असण्यासोबतच त्यांनी या संघाचे मेन्टॉर म्हणूनही काम केले.
Rahul Dravid आयपीएल २०२५ मध्ये करणार पुनरागमन?
२०१४ मध्ये द्रविडच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स संघाने चॅम्पियन्स लीग टी-२० चा अंतिम सामना खेळला होता. याशिवाय आयपीएलच्या प्लेऑफमध्येही पोहोचले होते. यानंतर २०२४ आणि २०१५ मध्ये ते संघाचे मेन्टॉर होते, यासह २०१५ मध्ये संघ तिसऱ्या क्रमांकावर होता.
हेही वाचा – Olympic 2024: हॉटस्टार, फॅनकोड नाही तर… भारतात ‘या’ अॅपवर फ्री पाहता येणार ऑलिम्पिकचे लाईव्ह सामने, जाणून घ्या सविस्तर
राहुल द्रविड आणि दिल्ली कॅपिटल्स</strong>
राहुल द्रविड २०१६ आणि २०१७ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे (तेव्हाची दिल्ली डेअरडेव्हिल्स) मेन्टॉर होते. द्रविड २०१५ पासून बीसीसीआयशी जोडले गेले. ते भारताच्या अंडर-१९ आणि भारत अ संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. यानंतर ते राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (NCA) प्रमुख होते. यानंतर ते ऑक्टोबर २०२१ मध्ये भारतीय संघाचे प्रशिक्षक बनले. २०२३ मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकानंतर त्यांचा कार्यकाळ संपला. त्यानंतर मुख्य प्रशिक्षक म्हणून त्यांचा कार्यकाळ २०२४ च्या टी-२० विश्वचषकापर्यंत वाढवण्यात आला.