ब्रिजटाऊन (बार्बाडोस) : एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील पराभवानंतर पदावर राहण्यासाठी विनंती करणारा कर्णधार रोहित शर्माचा दूरध्वनी आला नसता, तर, ट्वेन्टी-२० विश्वचषक जेतेपदाचा आनंद मला घेता आला नसता, असे भारतीय क्रिकेट संघाचे ट्वेन्टी-२० विश्वचषक जेतेपद मिळवून देणारे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी आपल्या निरोपाच्या भाषणात सांगितले.
द्रविड यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ हा एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर संपुष्टात आला होता. भारताने सलग दहा सामने जिंकल्यानंतर एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभूत व्हावे लागले होते.