ब्रिजटाऊन (बार्बाडोस) : एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील पराभवानंतर पदावर राहण्यासाठी विनंती करणारा कर्णधार रोहित शर्माचा दूरध्वनी आला नसता, तर, ट्वेन्टी-२० विश्वचषक जेतेपदाचा आनंद मला घेता आला नसता, असे भारतीय क्रिकेट संघाचे ट्वेन्टी-२० विश्वचषक जेतेपद मिळवून देणारे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी आपल्या निरोपाच्या भाषणात सांगितले.

द्रविड यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ हा एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर संपुष्टात आला होता. भारताने सलग दहा सामने जिंकल्यानंतर एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभूत व्हावे लागले होते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul dravid said rohit sharma stopped him from resigning after the odi world cup sport news amy
First published on: 03-07-2024 at 07:16 IST