Rahul Dravid said We need to focus on both our opening matches: पीसीबीने बुधवारी आशिया कप २०२३ चे वेळापत्रक जाहीर केले आहे. अनेक दिवस वेळापत्रकावरून वाद सुरू होता. ३० ऑगस्टपासून पाकिस्तानचे यजमानपद असलेल्या आशिया कप २०२३ सुरुवात होणार आहे. पहिला सामना पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात होणार आहे. भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी आशिया कपच्या वेळापत्रकावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानला तीन वेळा सामोरे जाण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.

आमचे लक्ष पहिल्या दोन सामन्यांवर असेल – द्रविड

बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये राहुल द्रविडने म्हटले आहे की, आशिया कपचे वेळापत्रक अखेर जाहीर झाले आहे. आणि आम्हाला पाकिस्तानविरुद्ध तीन वेळा खेळण्यासाठी सुपर-4 साठी पात्र व्हावे लागेल. राहुल द्रविड म्हणाला की, ”मला माहीत आहे की, आम्ही पाकिस्तान आणि नेपाळविरुद्ध पहिले दोन सामने खेळणार आहोत. त्यामुळे आत्ता आम्हाला त्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.”

Yogi Adityanath who made the statement Batenge to Katenge now has a different slogan Pune news
‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे याेगी आदित्यनाथ यांचा आता ‘हा’ नारा
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Rohit Sharma to miss first Test against Australia Jasprit Bumrah to captain in Perth Devdutt Padikkal will be added in Team
IND vs AUS: रोहित शर्मा पहिल्या कसोटीतून बाहेर, BCCIला दिली माहिती; त्याच्या जागी ‘या’ खेळाडूला संघात स्थान मिळणार
Harbhajan Singh believes India has a 50-50 chance of retaining the Border-Gavaskar Trophy in Australia
Harbhajan Singh : ‘जर सुरुवात चांगली झाली नाही तर…’, हरभजन सिंगचे पर्थ कसोटीपूर्वी मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘पहिलाच सामना खूप…’
IND vs AUS Sourav Ganguly Says Rohit Sharma should be playing the Perth Test
IND vs AUS : ‘… तर रोहित पुन्हा कधीही ऑस्ट्रेलियाला जाणार नाही’, सौरव गांगुलीचे हिटमॅनबद्दल मोठं वक्तव्य
Mohammed Shami Will Join Team India Squad for Border Gavaskar Trophy After 2nd Test Reveals Childhood Coach IND vs AUS
IND vs AUS: मोहम्मद शमी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघात कधी होणार सामील? कोचने दिले अपडेट
What Devendra Fadnavis Said?
Devendra Fadnavis : “बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है या घोषणांमध्ये चुकीचं काहीच नाही, या घोषणा..”; देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य

भारत-पाकिस्तान अंतिम फेरीत भिडू शकतात –

राहुल द्रविड पुढे म्हणाला की, “आम्हाला आमच्या सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. आम्हाला हे दोन्ही सामने जिंकायचे आहेत. ही स्पर्धा किती पुढे जाते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचलो, तर पाकिस्तानविरुद्ध आणखी एक लढत होईल, अशी अपेक्षा आहे.” यादरम्यान राहुल द्रविडने पाकिस्तानही अंतिम फेरीत पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली.

हेही वाचा – Auckland Firing: ऑकलंडमध्ये महिला फुटबॉल विश्वचषकाच्या उद्घाटनापूर्वी गोळीबार, दोघांचा मृत्यू

गतवर्षी पाकिस्तान आणि श्रीलंकेने दूर केले होते –

राहुल द्रविड पुढे म्हणाला की, “ही एक उत्कृष्ट स्पर्धा असणार आहे आणि आम्हाला निश्चितपणे अंतिम फेरीत खेळायला आणि जिंकायला आवडेल, परंतु त्यासाठी आम्हाला दोन महत्त्वाचे टप्पे पार करावे लागतील.” गेल्या वर्षीच्या आशिया कपमध्ये टीम इंडिया सुपर- 4 मधूनच बाहेर पडली होती. त्यांना पाकिस्तान आणि श्रीलंकेकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर अंतिम सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानचा पराभव करून विजेतेपद पटकावले. गेल्या वर्षी आशिया चषक टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवण्यात आला होता, मात्र यावेळी तो वनडे फॉरमॅटमध्ये होणार आहे.