Rahul Dravid son Samit Dravid six video viral : भारताचा माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा मुलगा समित द्रविड सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. सोशल मीडियावर क्रिकेट चाहते समितला ‘ज्युनियर वॉल’ आणि भावी ‘हिटमॅन’ म्हणत आहेत. कारण महाराजा टी-२० केएससीए स्पर्धेत त्याने असा एक उत्तुंग षटकार मारला, ज्याने डोळ्याचे पारणे फेडले.आता षटकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा शॉट पाहून त्ला कुणी म्हटलं ‘ज्युनियर वॉल’ तर कुणी भावी ‘हिटमॅन’ म्हणून वर्णन केले.

राहुल द्रविडच्या मुलाच्या षटकाराचा व्हिडीओ –

वास्तविक, महाराजा टी-२० केएससीए स्पर्धेच्या एका सामन्यात समित द्रविडने आपल्या दमदार षटकाराने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. म्हैसूर वॉरियर्सकडून खेळत असलेल्या समितने बेंगळुरू ब्लास्टर्सविरुद्धच्या सामन्यात एक लांबलचक षटकार ठोकला आणि आपली फलंदाजीची चमक दाखवली. समितने हा शॉट खडे-खडे मारला, ज्याचा चेंडू सहज सीमारेषेबाहेर कसा पाठवला हे व्हिडिओमध्ये दिसत आहे. मग यानंतर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव सुरू झाला आणि कमेंट्सचा महापूर आला.

Maharashtra Kesari 2025 result Shivraj Rakshe prithviraj mohol Controversy
Maharashtra Kesari : एवढं ‘मोहोळ’ का उठलंय? राष्ट्रवादीच्या नेत्याचा कुस्तीत राजकारण शिरल्याचा आरोप; म्हणाले, “खरा जिंकला तो…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Sonu Nigam
लाईव्ह शोमध्ये सोनू निगमच्या पाठीत सुरू झाल्या वेदना; व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “आयुष्यातील सर्वात कठीण…”
Marathi actor Sankarshan Karhade meet Sachin Tendulkar
“तू जमिनीवरचा देव दावला…”, सचिन तेंडुलकरच्या भेटीनंतर संकर्षण कऱ्हाडे भारावून गेला; पोस्ट लिहित म्हणाला, “पाच मिनिटं…”
Sachin Tendulkar likely to get BCCI CK Nayudu Lifetime Achievement Award
Sachin Tendulkar : BCCI ने घेतला मोठा निर्णय! सचिन तेंडुलकरला आयुष्यात पहिल्यांदाच मिळणार ‘हा’ खास पुरस्कार
hema malini laughed at ramdev baba
Video: गंगेत डुबकी मारणाऱ्या रामदेव बाबांनी केलं असं काही की…; हेमा मालिनींना हसू आवरेना
Shubman Gill Throws Bat in Anger After Controversial Dismissal in Ranji Trophy
Ranji Trophy: शुबमन गिल वादग्रस्तरित्या बाद झाल्यानंतर संतापला, हवेत फेकली बॅट अन् डोक्याला…, VIDEO व्हायरल
harry potter look alike
Maha Kumbh 2025: हातात पत्रावळी घेऊन प्रसादावर ताव मारताना दिसला हॅरी पॉटर? काय आहे Viral Videoचे सत्य?

चाहत्यांकडून समित द्रविडवर कौतुकांचा वर्षाव –

समित द्रविडच्या षटकारांचे सर्वत्र कौतुक होत आहे. सोशल मीडियावर चाहते सतत कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘आज द्रविड सरांना त्यांच्या मुलाचा अभिमान वाटत असेल. मी म्हणू शकतो की भारताला ही ‘ज्युनियर वॉल’ लवकरच मिळणार आहे. दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘ज्युनियर राहुल द्रविडसारखा दिसतोय.’

हेही वाचा – Duleep Trophy 2024 : ‘आम्ही जे काही कठोर पाऊल उचलले…’, जय शाहांचे श्रेयस-इशानबाबत मोठे वक्तव्य

समित द्रविडला मोठी खेळी साकारण्यात अपयशी –

मात्र, समितला मोठी खेळी साकारण्यात अपयशआले आणि संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये तो केवळ सात धावांचे योगदान देऊ शकला. शेवटी, पावसामुळे सामना विस्कळीत झाला, ज्यामुळे म्हैसूर वॉरियर्सचा ४ धावांनी पराभव झाला. महाराजा टी-२० लीग २०२४ मधील समित द्रविडचा हा पदार्पण सामना होता. तो म्हैसूर वॉरियर्स संघाचा एक सदस्य आहे. तो या स्पर्धेत अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळत आहे. स्पर्धेपूर्वी लिलावादरम्यान त्याच्यावर ५०,००० रुपयांची बोली लावण्यात आली होती.

Story img Loader