हैदराबाद : इंग्लंडने अति-आक्रमणाची ‘बॅझबॉल’ प्रवृत्ती रूढ केली असली, तरी त्याला तशाच पद्धतीने उत्तर द्यायलाच हवे असे नाही. पण, म्हणून मैदानात आमचे फलंदाज मागे राहतील असेही नाही, अशी प्रतिक्रिया भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी व्यक्त केली.
‘‘भारत आणि इंग्लंडदरम्यान गुरुवारपासून पहिला कसोटी सामना सुरू होणार आहे. सामन्यातील परिस्थितीनुसार आमचे नियोजन राहील. आमचा आक्रमक होण्याचा अजिबात विचार नाही. आमच्यासमोर जशी परिस्थिती असेल, तसा आम्ही खेळ करू. परिस्थिती काय सांगते हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. आघाडीच्या सातही फलंदाजांची नैसर्गिक गुणवत्ता असून, ते खेळ पुढे नेण्याचा सदैव प्रयत्न करतात,’’ असे द्रविड यांनी सांगितले.
‘‘‘बॅझबॉल’ ही इंग्लंडची शैली आहे. त्यांनी या शैलीशी जुळवून घेतले आहे. पाकिस्तान, न्यूझीलंडविरुद्ध त्यांनी विजय मिळवला. अॅशेस मालिकाही रंगतदार झाली. आम्ही त्यांचा आदर करतो. मात्र, त्यांच्याप्रमाणे आम्हीही खेळायला हवे असे नाही. आम्हाला आमच्या आक्रमणाच्या मर्यादा माहीत आहेत. खेळाडू त्याला कसा प्रतिसाद देतात हे पाहण्यासाठी मी उत्सुक आहे,’’ असे द्रविड म्हणाले.
हेही वाचा >>>IND vs ENG : राहुल द्रविडने घेतला मोठा निर्णय, केएल राहुलला ‘या’ जबाबदारीतून केले मुक्त
भारतीय संघाच्या भवितव्याविषयी बोलताना राहुल द्रविड म्हणाले, ‘‘या वर्षी आम्हाला भरपूर कसोटी क्रिकेट खेळायचे आहे. तरुण खेळाडूंपैकी काही जणांना पुढील पावले उचलण्याची चांगली संधी या मालिकेतून आहे. कोहली नसल्याचा फायदा उदयोन्मुख फलंदाज कसा उचलतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. आगामी व्यग्र कार्यक्रम लक्षात घेता खेळाडूंना सिद्ध करण्याची ही चांगली संधी असेल.’’
राहुल फक्त फलंदाज
संघात केएल राहुल, केएस भरत, ध्रुव जुरेल असे तीन यष्टीरक्षक आहेत. कसोटी सामन्यात राहुल यष्टीरक्षक म्हणून नाही, तर निव्वळ फलंदाज म्हणूनच खेळणार आहे. यष्टीरक्षकाची निवड अन्य दोघांमधूनच करण्यात येईल असे राहुल द्रविड यांनी स्पष्ट केले. भारतातील फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टी आणि जडेजा, अश्विनसारखे गोलंदाज लक्षात घेतले, तर त्यांच्यासमोर विशेषज्ञ यष्टीरक्षकच हवा, असा मुद्दाही द्रविड यांनी उपस्थित केला.
हेही वाचा >>>IND vs ENG : विराट कोहलीच्या जागी खेळणार ‘हा’ खेळाडू? आकाश चोप्राने सुचवलेल्या नावावर फक्त शिक्कामोर्तब होणे बाकी
खेळपट्टीतून फिरकीला मदत?
कसोटी सामना खेळविण्यात येणाऱ्या खेळपट्टीची पाहणी केल्यानंतर प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी फिरकीला पूर्ण मदत मिळणार असून, इंग्लंडला भारतीय फिरकीच्या आव्हानाचा सामना करावा लागेल असेही सांगितले. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूडने फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर आम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल असे मान्य केले. पण, त्याच वेळी त्याने आम्ही काही तरी विशेष करू शकतो इतका पुरेसा आत्मविश्वास आमच्या खेळाडूंमध्ये आहे. आमच्याकडे चांगले फिरकी गोलंदाज आहेत, चांगले वेगवान गोलंदाज आहेत, तसेच चांगले फलंदाजही आहेत हे विसरून चालणार नाही, असेही वूड म्हणाला.