Rahul Dravid In Bollywood:भारताच्या टी-२० वर्ल्डकप विजयात मोठी भूमिका बजावणारे राहुल द्रविड सध्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. क्रिकेटपासून दूर आपल्या कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवत आहे. टी -२० विश्वचषक २०२४ नंतर भारताचे मुख्या प्रशिक्षक म्हणून त्यांचा कार्यकाळ संपला. त्यामुळे सध्या द्रविडड क्रिकेटपासून दूर असले तरी इतर अनेक कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवत असतात. अलीकडेच ते मुंबईत झालेल्या CEAT क्रिकेट पुरस्कार सोहळ्यात दिसले, जिथे त्यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – PAK vs BAN: मोहम्मद रिझवानचे द्विशतक होण्यापूर्वीच शान मसूदने पाकिस्तानचा डाव का घोषित केला? सौद शकिलचे मोठे वक्तव्य

राहुल द्रविड हे भारतीय क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहेत. त्यांना त्यांच्या कारकिर्दीत एकही विश्वचषक जिंकता आलेला नाही. पण नुकतेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने टी-२० वर्ल्डकप जिंकला. सचिन तेंडूलकर, एमएस धोनी हे असे खेळाडू आहेत ज्यांच्यावर बायोपिक बनले आहेत. राहुल द्रविड यांना या अवॉर्ड शोदरम्यान विचारण्यात आले की, जर त्यांचा बायोपिक बनवला तर त्यात हिरो कोण असावा. यावर त्यांनी मजेशीर उत्तर दिले.

हेही वाचा – ENG vs SL: इंग्लंडच्या कसोटी संघात भारताच्या माजी खेळाडूचा लेक, अचानक कशी मिळाली संधी?

Rahul Dravid स्वत:च्या बायोपिकमध्ये स्वत:चं करणार काम?

अवॉर्ड शोमधील प्रश्नोत्तराच्या सत्रादरम्यान त्यांना विचारले – जर तुमचा बायोपिक बनला तर तुम्हाला त्यात कोणत्या अभिनेत्याने तुमची भूमिका साकारावी असे तुम्हाला वाटते? यावर द्रविडने गंमतीने उत्तर दिले – “जर मला जास्त पैसे मिळाले तर मला ही भूमिका स्वतः करायला आवडेल.” असे म्हटल्यावर त्यांच्या उत्तरानंतर तिथे बसलेले प्रेक्षक हसू लागले. ही क्लिप सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाली.

राहुल द्रविड यांनी वयाच्या १७व्या वर्षी कर्नाटककडून खेळायला सुरुवात केली. राहुलला नशिबाने पहिली कसोटी खेळण्याची संधी मिळाली. खरे तर १९९६ मध्ये इंग्लंड दौऱ्यात संजय मांजरेकर दुखापतग्रस्त झाल्याने बेंचवर बसलेल्या द्रविडला लॉर्ड्सवर खेळण्याची संधी मिळाली. याच सामन्यात सौरव गांगुलीनेही पदार्पण करताना शतक झळकावले, तर राहुल द्रविड ९५ धावा करून बाद झाला.

हेही वाचा – KL Rahul: केएल राहुलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जाहीर केली निवृत्ती? काय आहे व्हायरल इन्स्टाग्राम स्टोरीमागचं सत्य

गतवर्षी, भारत सलग १० सामने जिंकून एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला होता, परंतु स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट संघ जेतेपदाच्या लढतीत ऑस्ट्रेलियाविरूद्ध पराभूत झाला. सहा महिन्यांनंतर कर्णधार रोहित शर्मा आणि द्रविडने मिळून अपूर्ण काम पूर्ण केले आणि विश्वचषक भारतात आणला. टी-२० विश्वचषक फायनलमध्ये बलाढ्य दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघाला नशिबाने साथ दिली. दोन स्पर्धांदरम्यान टीम इंडियामध्ये झालेल्या बदलांबाबत द्रविडने सांगितले की, त्यांनी तयारी, नियोजन आणि अंमलबजावणी या बाबतीत वेगळे काही केले नाही आणि त्यांना संघात काहीही बदल करायचे नव्हते.

द्रविड म्हणाले, ‘खरं सांगायचं तर मला काही वेगळं करायचं नव्हतं. मला वाटतं की एकदिवसीय विश्वचषकात आमची मोहीम चांगली होती. रोहित आणि संघ, त्या एकदिवसीय विश्वचषकात सहभागी असलेले सर्वजण एकूण आमची मोहीम चांगली होती. आम्ही यापेक्षा चांगली तयारी करू शकलो नसतो किंवा यापेक्षा चांगले नियोजन आणि अंमलबजावणी करू शकलो नसतो. आम्ही सलग १० सामने जिंकण्यासाठी जे केले, तेच आम्ही संपूर्ण स्पर्धेत केलं. आम्हाला जे योग्य वाटलं ते आम्ही केलं.

पुढे द्रविड म्हणाले, मी एक खेळाडू म्हणून भारतातील विश्वचषकाचा भाग कधीच नव्हतो, पण प्रशिक्षक म्हणून एका शहरातून दुसऱ्या शहरात जाणे आणि हा खेळ या देशातील लोकांसाठी काय आहे, हे पाहणे खूप छान होते अभूतपूर्व आणि अविश्वसनीय होते. आम्ही फायनल हरलो आणि त्या दिवशी ऑस्ट्रेलियाने आमच्यापेक्षा चांगले क्रिकेट खेळले. तो एक चांगले संघ होता आणि त्यांचे अभिनंदन. खेळात अशा घगोष्टी घडतात आणि हा खेळ याच गोष्टींबाबत आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul dravid statement on biopic cast said if the money is good enough i will play it myself in ceat cricket awards watch video bdg