महेंद्रसिंग धोनीच्या कर्णधारपदाबाबत भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडने विश्वास व्यक्त केला आहे. पण सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा करायची असेल तर भविष्यात धोनीचा कर्णधारपदाचा भार निवड समितीने थोडा कमी करण्याची आवश्यकता आहे, असे मत द्रविडने व्यक्त केले आहे.
‘‘धोनी एक खेळाडू म्हणून सर्वोत्तम आहे, याचीही आपण जाणीव ठेवायला हवी. एक फलंदाज आणि यष्टीरक्षक म्हणून धोनीने बरेच योगदान दिले आहे. या चांगल्या गोष्टी आपण जोपासायला हव्यात,’’ असे द्रविड या वेळी म्हणाला. ‘‘भविष्यात निवड समितीने धोनीकडील एका प्रकारच्या क्रिकेटमधील कर्णधाराची जबाबदारी कमी करायला हवी. जेणेकरून तो आपल्यामधील खेळाडूला न्याय देऊ शकेल,’’ असे तो पुढे म्हणाला. मागील वर्षी भारतीय संघाने आठ कसोटी सामने गमावले. याविषयी द्रविड म्हणाला की, या पराभवांतून शिकण्याची संधी आपण धोनीला द्यायला हवी.

Story img Loader