भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सूत्रांनी स्पष्ट केले आहे, की टी-२० विश्वचषकानंतर राहुल द्रविड टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारेल. द्रविड लवकरच राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या (एनसीए) प्रमुखपदाचा राजीनामा देणार आहे. एनसीएमध्ये काम करण्यास प्राधान्य देतो, असे सांगून द्रविडने सुमारे एका महिन्यापूर्वी प्रशिक्षकपदाची ऑफर नाकारली होती. पण सौरव गांगुलीने द्रविडच्या विनंतीनंतर त्याने प्रशिक्षक होण्याचे मान्य केले आहे. आता जेव्हा द्रविडसारखा खेळाडू असेल, तर साहजिकच त्याचे मानधनही घसघशीत असेल. भारताचे सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यापेक्षा तो जास्त मानधन घेणार आहे.

राहुल द्रविडच्या मानधनापूर्वी आपण भारताच्या मागील प्रशिक्षकांचे मानधन जाणून घेऊ. सर्वप्रथम, २००३च्या दरम्यान जॉन भारताचे मुख्य प्रशिक्षक होते. त्यांना वर्षाला एक कोटी रुपये मानधन होते, तर ग्रेग चॅपल यांची वार्षिक फी १.२५ कोटी रुपये होती. चॅपेलनंतर गॅरी कर्स्टन यांना बीसीसीआयने वार्षिक २.५ कोटी रुपये दिले होते.

हेही वाचा – ये दिल मांगे राहुल..! द्रविडबाबत ‘तो’ खुलासा होताच नेटकऱ्यांचा सोशल मीडियावर जल्लोष

यानंतर, प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांची बीसीसीआयने दरवर्षी ४.२कोटी रुपयांच्या भरघोस मानधनावर प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली. अनिल कुंबळेचा कार्यकाळ अत्यंत संक्षिप्त होता, परंतु बोर्डाने कुंबळेला एका वर्षात ६.२५ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला होता. कुंबळेनंतर जेव्हा रवी शास्त्री आले.. शास्त्री यांचे वार्षिक मानधन १० कोटी रुपये होते.

आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआय राहुल द्रविडला वर्षाला १० कोटींचे मानधन देणार आहे. याशिवाय त्याला कामगिरीचा बोनसही दिला जाईल. द्रविडबरोबरच, एनसीएमध्ये त्याच्यासोबत गोलंदाजी प्रशिक्षक असलेले पारस म्हांब्रे यांची पुढील गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे.

Story img Loader