भारताचे माजी कर्णधार आणि युवा (१९ वर्षांखालील) क्रिकेट संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा मुलगा समितने राज्यस्तरावरील शालेय स्पर्धेत शतक झळकावले.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
राज्य संघटनेतर्फे १४ वर्षांखालील गटाची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. समितने मल्या आदिती आंतरराष्ट्रीय प्रशालेकडून खेळताना १५० धावा ठोकल्या. त्यामुळेच त्यांच्या संघाला विवेकानंद प्रशालेवर ४१२ धावांनी विजय मिळवता आला. माजी कसोटी फिरकी गोलंदाज सुनील जोशी यांचा मुलगा आर्यननेही १५४ धावांची खेळी करताना समितच्या साथीने मोठी भागीदारी रचली. त्यामुळे त्यांच्या संघाला ५० षटकांमध्ये ५ बाद ५०० असा धावांचा डोंगर रचता आला. विवेकानंद प्रशालेचा डाव अवघ्या ८८ धावांत कोसळला.
First published on: 11-01-2018 at 02:54 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul dravids son impresses with hundred in school cricket