Sanju Samson and KL Rahul: के.एल. राहुलचे दुखापतीतून पुनरागमन आणि आशिया चषक २०२३साठी भारतीय संघात थेट निवड झाल्याबद्दल अनेक आजी-माजी दिग्गज क्रिकेट पटूंनी प्रतिक्रिया आहेत. त्याच यादीत आता पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरियाने एक वक्तव्य केले आहे. त्याने थेट बीसीसीआयच्या निवडकर्त्यांवर निशाणा साधत संघ निवडीवर टीका केली. “के.एल. राहुलच्या फिटनेसबद्दल शंका आहे, त्यामुळे निवडकर्त्यांनी त्याला संजू सॅमसनऐवजी राखीव ठेवायला हवे होते,” असे कनेरियाने म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरिया म्हणाला, “राहुलला आशिया कपमध्ये राखीव खेळाडू असायला हवे होते. भारताने पॉवर हिटर संजू सॅमसनचा राखीव फलंदाज म्हणून त्यांच्या संघात समावेश केला आहे. हे त्यांनी उलट करायला हवं होत. संजू मुख्य संघात आणि लोकेश राखीव खेळाडू. के.एल. राहुलने कसोटी क्रिकेटमध्ये कामगिरी केली नाही, त्यामुळे त्याचे स्थान गमवावे लागले. यानंतर तो आयपीएलमध्येही धावा करण्यात अपयशी ठरला. मग तो आयपीएलमध्ये जखमी झाला होता आणि बरा झाल्यानंतर त्याला पुन्हा एकदा संघात स्थान मिळाले, हे अजिबातच योग्य नाही. भारताने जर के.एल. राहुलला आणखी एक संधी देण्याचे ठरवले असेल तर संजू सॅमसनलाही संघात असायला हवे होते. कदाचित राहुल एवढं मोठं नाव बनलं आहे की ते त्याला ते संघातून काढू शकत नाहीत.”

दानिश कनेरिया म्हणाला की, “संजू सॅमसनला पुन्हा एकदा ड्रिंक्स घेऊन जावे लागेल. त्यानंतर पुन्हा एकदा अनेक जण म्हणतील की, त्याला अन्यायकारक वागणूक दिली जात आहे. मी याच्याशी असहमत आहे. त्याला पुरेशी संधी दिली गेली जी त्याने दोन्ही हातांनी घेतली नाही. जर संघात संधी दिली जाते तेव्हा तुम्हाला परफॉर्म करावे लागते नाहीतर दुसऱ्या खेळाडूला जागा मोकळी करून द्यावी लागते.”

हेही वाचा: Asia Cup 2023: आशिया चषकाच्या कामगिरीवर होणार टीम इंडियाची वर्ल्डकपसाठी निवड, ‘या’ पाच खेळाडूंवर असणार BCCIची नजर

के.एल. राहुलवर विशेष लक्ष

मुख्य निवडक अजित आगरकर यांनी भारतीय संघाची घोषणा करताना राहुलला अजूनही काही समस्या असल्याचे सांगितले होते. त्यामुळे तो आशिया चषकाच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये भाग घेऊ शकणार नाही.

मैदानावरील त्याच्या कामगिरीवर सर्वांचेच विशेष लक्ष असणार आहे त्यात ‘मॅच सिम्युलेशन’ सत्रांचा समावेश असेल. त्याचे पर्यवेक्षण फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठौर आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड करतील. के.एल. राहुलच्या तंदुरुस्तीवर संघ व्यवस्थापन लक्ष ठेवून आहे. राहुल फिटनेस ड्रिलमध्येही सामील होता पण त्याला यो-यो टेस्ट करायला नाही सांगितली. राहुलचा भारताच्या आशिया चषक संघात समावेश करण्यात आला आहे. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर म्हणाले की, “यष्टीरक्षक फलंदाजाला किरकोळ दुखापत झाली आहे जी त्याच्या पूर्वीच्या दुखापतीशी संबंधित नव्हती. त्यामुळे तो लवकरच मैदानावर खेळताना दिसेल.”

हेही वाचा: Ab De Villiers: एबी डिव्हिलियर्सने त्याचा खास मित्र कोहलीला दिला बटिंग ऑर्डर बदलण्याचा सल्ला; म्हणाला, “या जागेसाठी तो…”

आशिया कपसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा. बॅकअप: संजू सॅमसन

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul should have been reserve player not sanju ex pak player furious over indias asia cup team selection avw
Show comments