न्यूझीलंडचा क्रिकेटपटू जेसी रायडर शनिवारी कोमातून बाहेर आला आहे. परंतु हल्ल्याच्या आघातामधून तो अद्याप पूर्णत: सावरलेला नाही, असे त्याचे व्यवस्थापक आरोन क्ली यांनी सांगितले.
ख्राइश्चर्चमधील एका बारबाहेर गुरुवारी पहाटे रायडरवर प्राणघातक हल्ला झाला. त्यानंतर चिंताजनक अवस्थेत रायडरला इस्पितळात दाखल करण्यात आले आणि कृत्रिम श्वासोच्छ्वास पुरविण्यात आला. त्याच्या डोक्याला आणि फुप्फुसाला गंभीर स्वरूपाच्या जखमा आढळल्या.
या हल्ल्याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोनच हल्लेखोरांनी रायडरला मारहाण केली असावी. परंतु साक्षीदारांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत चार हल्लेखोरांचा समावेश होता.
‘‘जेसीची प्रकृती सुधारत असून, तो कोमातून बाहेर आला आहे. याचप्रमाणे व्हेंटिलेटरसुद्धा काढण्यात आले आहे. जेसी आता आमच्याशी संवाद करतो. परंतु पुन्हा पूर्ववत होण्यासाठी आयुष्याची मोठी लढाई करावी लागणार आहे. परंतु ही प्रक्रिया सकारात्मक पद्धतीने सुरू झाली आहे,’’ असे क्ली म्हणाले. रायडरला हल्ल्यासंदर्भात काहीही आठवत नसल्याचे क्ली यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा