India vs Australia 5th T20 Match: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पाचवा टी-२० सामना एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू येथे होणार आहे. रविवार ३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता हा सामना होणार आहे. पण चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे, इथे पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि त्याचा परिणाम सामन्यावरही दिसून येईल. रविवार ३ डिसेंबर २०२३ रोजी बंगळुरूमध्ये हवामान कसे असेल? ते जाणून घेऊ या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेबद्दल जर बोलायचे तर टीम इंडियाने चौथा सामना जिंकून अजेय आघाडी घेतली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने पहिला आणि दुसरा टी-२० जिंकला. तिसर्‍या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ५ गडी राखून पराभव केला. मात्र, चौथ्या टी-२०पूर्वी ऑस्ट्रेलियाचे ६ मुख्य फलंदाज आपल्या देशात परतले होते. रायपूर येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा २० धावांनी पराभव करत मालिका जिंकली. पाचवा टी-२० सामना जिंकून ऑस्ट्रेलियाला मालिका सकारात्मक पद्धतीने संपवायची आहे.

हेही वाचा: IND vs AUS: इतिहास रचण्यासाठी टीम इंडिया सज्ज! वॉशिंग्टन-तिलक यांना मिळू शकते संधी, जाणून घ्या संभाव्य प्लेईंग-११

बंगळुरूमध्ये हवामान कसे असेल?

रविवारी बंगळुरूमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. सकाळी पावसाची शक्यता १५ टक्के आहे. हा सामना संध्याकाळी ७ वाजल्यापासून खेळवला जाईल, त्यावेळी पावसाची शक्यता ११ टक्के आहे. संध्याकाळी जरी पावसाची शक्यता तशी नसली तरी सामना रद्द होण्याचा धोका आहे, पण जर सामन्याच्या मध्यभागी पाऊस पडला तर खेळ काही षटके कमी होऊ शकतो.

बंगळुरूमधील पावसाचा एम. चिन्नास्वामीच्या खेळपट्टीवरही परिणाम होऊ शकतो. खेळपट्टीवर कमी उसळी दिसू शकते. जरी येथील आऊटफिल्ड वेगवान असले तरी पाऊस पडल्यास आऊटफिल्ड थोडी संथ होऊ शकते. बंगळुरूमध्ये रविवारी संध्याकाळी ७-८च्या सुमारास सामन्याच्या वेळी आर्द्रता ६४ टक्के असेल आणि वारे ताशी २१ किलोमीटर वेगाने वाहतील.

एम. चिन्नास्वामी स्टेडियमवरील टी-२० रेकॉर्ड

एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आतापर्यंत ७ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले गेले आहेत. २०१२ मध्ये येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यात पहिला टी-२० सामना झाला होता, ज्यामध्ये पाकिस्तानने बाजी मारली होती. भारताने येथे ५ टी-२० सामने खेळले आहेत, त्यापैकी २ जिंकले आणि ३ वेळा पराभव पत्करावा लागला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात येथे यापूर्वी एक टी-२० सामना खेळला गेला आहे. २०१९ मध्ये झालेल्या त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ७ गडी राखून विजय मिळवला होता.

हेही वाचा: Mitchell Johnson: ऑस्ट्रेलियाच्या जॉन्सनने डेव्हिड वॉर्नरवर भडकला; म्हणाला, “गुन्हेगाराला निरोपाची मालिका…”

बंगळुरूमध्ये ७ पैकी ५ वेळा संघाने प्रथम गोलंदाजी जिंकली आहे, याचा अर्थ येथे लक्ष्याचा पाठलाग करणे चांगले सोप्पे होईल. तर प्रथम फलंदाजी करणारा संघ दोनदा जिंकला आहे. येथे २०० पेक्षा जास्त धावा केवळ एकदाच गाठली गेली आहेत. भारताने २०१७ मध्ये येथे इंग्लंडविरुद्ध २०२/६ धावा केल्या होत्या, जी या मैदानावरील आतापर्यंतची सर्वोच्च टी-२० धावसंख्या आहे.

ग्लेन मॅक्सवेल हा या मैदानावर सर्वाधिक टी-२० धावा करणारा फलंदाज आहे. त्याने येथे २ आंतरराष्ट्रीय डावात १३९ धावा केल्या आहेत, त्याने येथे ११३ धावांची संस्मरणीय खेळी खेळली. दुसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आहे, ज्याने ५ डावात ११६ धावा केल्या आहेत. या मैदानावर सर्वाधिक टी-२० विकेट्स युजवेंद्र चहलने घेतल्या आहेत, त्याने २ डावात ६ विकेट्स घेतल्या आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rain can become a villain fifth t20 see the record of m chinnaswamy stadium before india australia match avw