India vs Bangladesh MCA Pitch Report in Marathi: एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये टीम इंडियाचा सामना गुरुवारी १९ ऑक्टोबर रोजी बांगलादेशशी होणार आहे. बांगलादेशचा संघ २५ वर्षांनंतर भारताविरुद्ध एकदिवसीय सामना खेळणार आहे. बांगलादेशने भारताविरुद्ध शेवटचा वनडे सामना १९९८ मध्ये भारतात वानखेडेवर खेळला होता. विश्वचषक २०२३ बद्दल बोलायचे झाले, तर भारतीय संघ उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. ऑस्ट्रेलियानंतर त्याने अफगाणिस्तान आणि पाकिस्तानला पराभूत केले आहे. दुसरीकडे, बांगलादेशचा संघ ३ पैकी २ सामन्यात पराभूत झाला आहे. त्याने अफगाणिस्तानचा पराभव केला होता. यानंतर त्याला इंग्लंड आणि न्यूझीलंडकडून पराभवाला सामोरे जावे लागले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमच्या खेळपट्टीचा अहवाल –

भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (एमसीए) होणार आहे. एमसीएबद्दल बोलायचे तर, २०१७ पूर्वी फलंदाजी करणाऱ्या संघांनी येथे पाच पैकी तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये ३०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. लहान सीमारेषेमुळे खूप धावा होतात. मात्र, या मैदानावर नऊ महिन्यांतील भारत आणि बांगलादेश यांच्यातील हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना असेल. यानंतरही ही खेळपट्टी फलंदाजांना अनुकूल असेल.

पुण्यात बुधवारी झाला तुरळक पाऊस –

पुण्याच्या हवामानाबद्दल बोलायचे झाले, तर बुधवारी सायंकाळी तुरळक पावसाने हजेरी लावली. एमसीए स्टेडियमवर दोन्ही संघांच्या सराव सत्रादरम्यान रिमझिम पावसामुळे मैदानावरील कर्मचाऱ्यांना मुख्य खेळपट्टी झाकण्यासाठी धावपळ करावी लागली. हवामान खात्याने (आयएमडी) बुधवारी आकाश अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज वर्तवला होता. सामन्याच्या दिवशी म्हणजे गुरुवारी हवामान चांगले राहण्याची अपेक्षा आहे. यावर्षी महाराष्ट्र राज्यात मान्सून ऑक्टोबरपर्यंत लांबला आहे आणि हिवाळ्यापूर्वी या भागात पाऊस पडतो.

हेही वाचा – IND vs BAN: ‘बांगलादेशने भारताला हरवले तर…’, पाकिस्तानी अभिनेत्रीने बांगलादेशी खेळाडूंना दिली खास ऑफर

भारतीय संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, इशान किशन, सूर्यकुमार यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन आश्विन, कुलदीप यादव.

बांगलादेश संघ –

लिटन दास, तनजी हसन, मेहदी हसन मिराज, नजमुल हुसेन शांतो, शकिब अल हसन (कर्णधार), मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), तौहीद हृदोय, महमुदुल्लाह, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, शोरीफुल इस्लाम, तनजी हसन शाकिब, हसन महमूद, महेदी हसन, नसूम अहमद.