आयपीएल २०२१ स्पर्धेत प्लेऑफची स्पर्धा रंगतदार वळणावर असताना आता जवळपास चित्र स्पष्ट झालं आहे. चेन्नई, दिल्ली आणि बंगळुरूनंतर आता कोलकात्याचं प्लेऑफमधलं स्थान जवळपास निश्चित झालं आहे. कोलकात्याने राजस्थानला मोठ्या फरकाने पराभूत केल्याने मुंबईच्या आशा जवळपास मावळल्या आहेत. यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडला आहे. मुंबईकर फॅन्स मीम्सच्या माध्यमातून राजस्थानच्या कामगिरीवर ताशेरे ओढत आहेत. मजेशीर मीम्स पाहून हसू आवरत नाही. राजस्थानच्या पराभवामुळे अंबानी ट्रेण्डिंगमध्ये आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोलकाताने राजस्थानला ८७ धावा आणि २३ चेंडू राखून पराभूत केल्याने गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे. तर +०.५८७ धावगती आहे. त्यामुळे मुंबईला हैदराबादला पराभूत करत -०.०४८ धावगतीतून धन धावगतीत येणं जवळपास अशक्यप्राय आहे. कोलकात्याला धावगतीत मागे टाकायचं असल्यास मुंबईला २०० धावा कराव्या लागतील आणि १७१ धावांनी विजय मिळवावा लागेल. तर कोलकात्याला धावगतीत मागे टाकता येईल. त्याचबरोबर दुसरी फलंदाजी आल्यास विजयी धावसंख्येचा पाठलाग करून धावगती गाठणं शक्य नाही. त्यामुळे नाणेफेकीवरही सर्वकाही अवलंबून असणार आहे.

मुंबई इंडियन्सने आयपीएल स्पर्धेचे पाच किताब आपल्या नावावर केले आहेत. मुंबई इंडियन्सने २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये किताब जिंकला आहे. प्लेऑफमध्ये स्थान मिळाल्यास हॅट्ट्रीक करण्याची संधी रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स संघाला आहे.

मुंबईचा संघ- रोहित शर्मा (कर्णधार), एडम मिल्ने, आदित्य तारे, अनमोलप्रीत सिंह, अनुकुल रॉय, ख्रिस लिन, धवल कुलकर्णी, हार्दीक पंड्या, इशान किशन, जेम्स नीशम, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, किरोन पोलार्ड, कृणाल पंड्या, मार्को जेनसेन, मोहसिन खान, नाथन कुल्टर नाइल, पीयूष चावला, क्विटन डी कॉक, राहुल चाहर, सौरभ तिवारी, सूर्यकुमार यादव, ट्रेंट बोल्ट, युद्धवीर सिंह

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rain of memes on twitter after kolkata beat rajasthan ambani in the trend rmt