दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी गाजवला, तर दुसरा दिवस गाजवला तो पावसाच्या फलंदाजीने. दुसऱ्या दिवशी पावसाने धुवाधार फलंदाजी केल्यामुळे एकही चेंडू खेळणे शक्य झाले नाही. दोन्ही पंच आणि सामनाधिकाऱ्यांनी चार वाजता सामना न खेळवण्याचा निर्णय औपचारीकरीत्या जाहीर केला.
तब्बल २९ वर्षांनी ऑस्ट्रेलियामध्ये संपूर्ण दिवस पावसामुळे वाया जाण्याची वेळ शनिवारी आली. यापूर्वी २९ नोव्हेंबर १९८३ साली ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरा कसोटी सामना गाब्बाच्या मैदानावर झाला होता, त्या वेळी या सामन्याचा संपूर्ण अंतिम दिवस पावसामुळे वाया गेला होता.
पहिल्या दिवशी अमला (खेळत आहे ९०) आणि कॅलिस (खेळत आहे ८४) यांनी शतकाच्या दिशेने कूच करत दक्षिण आफ्रिकेला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. आता रविवारी जेव्हा ते मैदानात उतरतील तेव्हा त्यांच्याकडून शतकाची अपेक्षा असेल.
दुखापतग्रस्त डय़ुमिनी दौऱ्याला मुकणार
पहिला दिवस संपल्यानंतर सरावादरम्यान रग्बी खेळताना दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज जे. पी. डय़ुमिनी याच्या डाव्या पायाच्या पोटऱ्यांना दुखापत झाली असून त्याच्यावर आता शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या शस्त्रक्रियेनंतर डय़ुमिनीला तीन ते सहा महिन्यांची विश्रांती घ्यावी लागेल, असा सल्ला डॉक्टरांनी दिल्यामुळे त्याला संपूर्ण ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकावे लागणार आहे.
दुसरा दिवशी पावसाचीच फलंदाजी
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी गाजवला, तर दुसरा दिवस गाजवला तो पावसाच्या फलंदाजीने.
First published on: 11-11-2012 at 01:23 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rain on second day