न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या विजयावरील इंग्लंडचे स्वप्नावर पावसाने पाणी सांडले. जोरदार वर्षांवामुळे पाचव्या दिवसाचा खेळ होऊ शकला नाही आणि सामना अनिर्णित अवस्थेत संपला. चौथ्या दिवसअखेर न्यूझीलंडची फॉलोऑननंतर २ बाद १६२ अशी अवस्था होती. त्या वेळी केन विल्यमसन (नाबाद ५०) आणि रॉस टेलर (नाबाद ४१) खेळत होते. पहिल्या सामन्याबरोबरच दुसरा सामनाही अनिर्णित राहिल्याने तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याच्या निकालावर साऱ्यांची नजर असेल.

Story img Loader