आगामी हंगामात चांगली कामगिरी होण्याच्या दृष्टीने भारताचा मधल्या फळीतील फलंदाज सुरेश रैनाने सिंथेटिक स्वरुपाच्या खेळपट्टीवर सरावाची युक्ती अंगीकारली आहे. नुकत्याच विवाहबद्ध झालेला रैना पत्नीसह नेदरलँड्समध्ये आहे. मात्र सुट्टीवर असतानादेखील रैनाचा क्रिकेटचा ध्यास जराही कमी झालेला नाही. अ‍ॅमस्टरडॅम क्रिकेट क्लबच्या उच्च कामगिरी सरावाचा तो भाग झाला असून, सुमारे महिनाभर तो या कार्यक्रमात सहभागी होणार आहे.

Story img Loader