सुरेश रैनाचे ‘Believe: What Life and Cricket Taught Me’ हे आत्मचरित्र प्रकाशित झाले. यापुर्वी त्याने ट्विटरवरुन ही माहिती दिली होती. त्याने एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये रैना आपल्या पुस्तकावर सही करताना दिसत होता. यामध्ये त्याने लीहले होते की, “माझे ‘Believe’ हे पुस्तक १४ जूनला प्रकाशित होईल. आशा आहे की तुम्हाला ते वाचतांना आनंद होईल.” पुस्तकाच्या माध्यमातून रैनाने अनेक रंजक गोष्टी समोर आणल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या पुस्तकात रैनाने महेंद्रसिंग धोनीसोबतच्या मैत्रीबद्दल एक खुलासा देखील केला आहे. रैनाने आपल्या पुस्तकात लिहिले की, “मी टीम इंडियामध्ये खेळलो, याचे कारण लोकं धोनीला देतात. मात्र, धोनीच्या मैत्रीमुळे मी टीम इंडियामध्ये खेळलो असं नाही. मी फक्त माझ्या मेहनत आणि कामगिरीच्या जोरावर टीम इंडियामध्ये खेळू शकलो,”

हेही वाचा- Believe: सुरेश रैनाची आत्मचरित्रात धुव्वादार बॅटिंग, केले अनेक मोठे खुलासे

कठोर परिश्रमातूनच मी धोनीचा विश्वास आणि आदर जिंकला

“धोनी बरोबर असलेल्या मैत्रीमुळे मी टीम इंडियामध्ये खेळलो, असं नाही. मी फक्त माझ्या मेहनत आणि कामगिरीच्या जोरावर टीम इंडियामध्ये खेळू शकलो. माझ्याकडून उत्तम कामगिरी कशी करुन घ्यावी, हे धोनीला माहित होते आणि मलाही त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. जेव्हा धोनीशी असलेल्या मैत्रीमुळे मी टीम इंडियामध्ये खेळलो, असे लोकं बोलतात तेव्हा खूप त्रास होतो. टीम इंडियामध्ये माझे स्थान निर्माण करण्यासाठी मी नेहमीच परिश्रम घेतले आहेत. कठोर परिश्रमातूनच मी धोनीचा विश्वास आणि आदर जिंकला”, असे रैना म्हणाला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raina says about bonding with dhoni in his book srk