आयपीएल सट्टेबाजी प्रकरणात अडकलेला राजस्थान रॉयल्सचा सहमालक राज कुंद्रा याने सध्याच्या घडामोडींबद्दल माफी मागत पत्नी शिल्पा शेट्टीला तिच्या वाढदिवसाच्या ‘ट्विटर’वरून शुभेच्छा दिल्या आहेत.
ब्रिटनचा नागरिक असलेल्या कुंद्राचे भारतात अनेक व्यवसाय आहेत. काही दिवसांपूर्वी आयपीएलच्या सट्टेबाजी आणि स्पॉट-फिक्सिंगप्रकरणी कुंद्राला दिल्ली पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. चौकशीदरम्यान कुंद्राने सट्टेबाजी केल्याची कबुली दिली असल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले होते. त्यामुळे वाढदिवसाच्या दिवशी आपल्या नाराज पत्नीची माफी मागत कुंद्राने शुभेच्छा दिल्या आहेत.
‘ट्विटर’वर कुंद्राने लिहिले आहे की, ‘‘माझ्या सुंदर पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. सध्या ज्या निर्थक गोष्टींचा सामना तुला करावा लागत आहे, त्यासाठी क्षमस्व. पण सत्य नक्कीच समोर येईल!’’
कुंद्राची राजस्थान रॉयल्स संघाच्या मालकीमध्ये ११.७ टक्के हिस्सेदारी आहे. जर कुंद्रा दोषी आढळला तर त्याला आपली संघातील हिस्सेदारी गमवावी लागेल, असे संघ व्यवस्थापनाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

Story img Loader