आयपीएल २०२१ स्पर्धेतील प्लेऑफमध्ये चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांनी स्थान मिळवलं. मात्र चौथ्या स्थानावर कोण याबाबत अजूनही तळ्यात मळ्यात होतं. या शर्यतीतून पंजाब आणि राजस्थान बाहेर गेलं आहे. तर मुंबईच्या आशा आता विजय आणि धावगतीवर अवलंबून आहेत. मुंबईने मोठ्या फरकाने विजय मिळवल्यास प्लेऑफमध्ये स्थान मिळेल. मात्र गणित जवळपास कठीण आहे. त्यामुळे विजय मिळवूनही मुंबईला प्लेऑफ स्थान मिळवणं सोपं नाही, असंच दिसत आहे. कोलकाताने राजस्थानला मोठ्या फरकाने पराभूत केल्याने दोन गुणांसह धावगतीत वाढ झाली आहे.

कोलकाताने राजस्थानला ८७ धावा आणि २३ चेंडू राखून पराभूत केल्याने गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे. तर +०.५८७ धावगती आहे. त्यामुळे मुंबईला हैदराबादला पराभूत करत -०.०४८ धावगतीतून धन धावगतीत येणं जवळपास अशक्यप्राय आहे. कोलकात्याला धावगतीत मागे टाकायचं असल्यास मुंबईला २०० धावा कराव्या लागतील आणि १७१ धावांनी विजय मिळवावा लागेल. तर कोलकात्याला धावगतीत मागे टाकता येईल. त्याचबरोबर दुसरी फलंदाजी आल्यास विजयी धावसंख्येचा पाठलाग करून धावगती गाठणं शक्य नाही. त्यामुळे नाणेफेकीवरही सर्वकाही अवलंबून असणार आहे.

मुंबई इंडियन्सने आयपीएल स्पर्धेचे पाच किताब आपल्या नावावर केले आहेत. मुंबई इंडियन्सने २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये किताब जिंकला आहे. प्लेऑफमध्ये स्थान मिळाल्यास हॅट्ट्रीक करण्याची संधी रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स संघाला आहे.

मुंबईचा संघ- रोहित शर्मा (कर्णधार), एडम मिल्ने, आदित्य तारे, अनमोलप्रीत सिंह, अनुकुल रॉय, ख्रिस लिन, धवल कुलकर्णी, हार्दीक पंड्या, इशान किशन, जेम्स नीशम, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, किरोन पोलार्ड, कृणाल पंड्या, मार्को जेनसेन, मोहसिन खान, नाथन कुल्टर नाइल, पीयूष चावला, क्विटन डी कॉक, राहुल चाहर, सौरभ तिवारी, सूर्यकुमार यादव, ट्रेंट बोल्ट, युद्धवीर सिंह

Story img Loader