सातत्यपूर्ण आणि झुंजार खेळासाठी प्रसिद्ध महाराष्ट्राची आजपासून राजस्थानशी लढत होत आहे. अंकित बावणे आणि चिराग खुराणा यांनी हरयाणाविरुद्ध झुंजार शतके झळकावली होती. महाराष्ट्राकडे स्वप्निल गुगळे, हर्षद खडीवाले, रोहित मोटवानी आणि केदार जाधव अशी फलंदाजांची दमदार फळी आहे. गोलंदाजीत समद फल्ला, श्रीकांत मुंढे यांच्यावर जबाबदारी आहे. आसामविरुद्ध डावाच्या पराभवाला सामोरे गेलेल्या राजस्थानला कामगिरीत आमूलाग्र सुधारणा करावी लागणार आहे. अंतर्गत बंडाळ्यांनी त्रस्त राजस्थानला मैदानाबाहेरच्या गोष्टी बाजूला ठेवून मैदानावर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. अशोक मनेरियाला फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाडय़ांवर लक्ष द्यावे लागणार आहे. विनीत सक्सेनाकडून मोठय़ा खेळीची अपेक्षा आहे. दीपक चहर, अनिकेत चौधरी ही वेगवान गोलंदाजांची जोडगोळी राजस्थानसाठी जमेची बाजू आहे.

Story img Loader