माफक धावांचे लक्ष्य ठेवूनही भुवनेश्वर कुमार आणि डेल स्टेन यांनी भेदक मारा करत प्रतिस्पर्ध्यांच्या फलंदाजांना नतमस्तक केल्यामुळे सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सवर३२ धावांनी विजय साकारला. हैदराबादचे १३५ धावांचे आव्हान पार करताना भुवनेश्वर आणि स्टेन यांच्या गोलंदाजीसमोर
राजस्थानचे फलंदाज एकापाठोपाठ माघारी परतल्यामुळे त्यांचा डाव १०२ धावांवरच आटोपला. राजस्थानकडून स्टीव्हन स्मिथने सर्वाधिक २२ धावांची खेळी केली. राजस्थानच्या चार फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखविणाऱ्या भुवनेश्वरला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्याआधी, शेन वॉटसन आणि रजत भाटिया यांच्या मध्यमगती गोलंदाजीसमोर हैदराबादला ९ बाद १३४ धावाच करता आल्या. शिखर धवनने सर्वाधिक ३३ धावांचे योगदान दिले. वॉटसन आणि भाटिया यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवले.

संक्षिप्त धावफलक
सनरायझर्स हैदराबाद : २०
षटकांत ९ बाद १३४
(शिखर धवन ३३, इरफान
पठाण २१; शेन वॉटसन
३/१३, रजत भाटिया ३/२३)
विजयी विरुद्ध राजस्थान
रॉयल्स : १९.५ षटकांत
सर्व बाद १०२ (स्टीव्हन स्मिथ २२, संजू
सॅमसन १६; भुवनेश्वर कुमार ४/१४, डेल
स्टेन २/३१)
सामनावीर : भुवनेश्वर कुमार

Story img Loader