आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा अष्पैलू क्रिकेटपटू श्रेयस गोपाल लवकरच आपली गर्लफ्रेंड निकितासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. राजस्थान रॉयल्सने ट्विटरवर या दोघांचे अभिनंदन केले असून दोघांनाही फ्रँचायझीचा भाग मानत शुभेच्छा दिल्या आहेत.
आयपीएलच्या १४व्या पर्वात श्रेयस खेळताना दिसला होता. बायो बबलमध्ये करोना विषाणूच्या प्रवेशामुळे स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. मात्र, आता आयपीएल पुन्हा एकदा सप्टेंबरमध्ये यूएईत होणार आहे.

आयपीएल २०२१च्या पहिल्या टप्प्यात श्रेयसची कामगिरी फारशी खास नव्हती. त्याने आरसीबीविरुद्ध नाबाद सात धावा केल्या, तर पंजाब किंग्जविरुद्ध त्याला फलंदाजी करता आली नाही. गोलंदाजीत त्याने दोन सामन्यांमध्ये अधिक धावा दिल्या, पण त्याला एकही विकेट मिळवण्यात यश आले नाही. मात्र, त्याला आता यूएईतील दुसऱ्या टप्प्यात पुन्हा एकदा चांगला कामगिरी करण्याची संधी आहे. आयपीएल २०२१चे उर्वरित ३१ सामने यूएईत होतील.

 

हेही वाचा – IPL 2021 : इंग्लंड क्रिकेट बोर्डानं आपल्या खेळाडूंच्या सहभागाविषयी दिली ‘मोठी’ प्रतिक्रिया

राजस्थान रॉयल्सच्या संघाला यावेळी प्लेऑफमध्ये जाण्याची चांगली संधी असेल. त्यांच्याकडे आता ७ लीग स्टेज सामने आणि ६ गुण आहेत. रॉयल्स संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. उर्वरित काही सामन्यांमध्ये, संघ चांगल्या कामगिरीद्वारे अव्वल चारमध्ये पुढे जाऊ शकतो.

बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर फक्त रॉयल्सकडून खेळतात. स्टोक्सने अनिश्चित काळासाठी विश्रांती घेतली आहे आणि जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे संपूर्ण वर्ष क्रिकेटपासून दूर असणार आहे. बेन स्टोक्स आयपीएलसाठी उपलब्ध होणार, की नाही हे पाहणे बाकी आहे. जोस बटलर आणि संजू सॅमसन हे संघाचे फलंदाजीचा विभाग सांभाळतील. अशा स्थितीत दोघांचेही फॉर्मात असणे महत्त्वाचे ठरेल. ख्रिस मॉरिसचा अष्टपैलू खेळ देखील खूप प्रभाव पाडू शकतो.

Story img Loader