आगामी आयपीएल हंगामासाठी राजस्थान रॉयल्स संघाने पॅडी अपटन यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. याआधीही 2013-15 सालात अपटन यांनी राजस्थानच्या संघाचं प्रशिक्षकपद भूषवलं होतं. अपटन यांच्या मार्गदर्शनाखाली 2013 साली राजस्थान रॉयल्सचा संघ उपांत्य फेरीपर्यंत पोहचला होता. राजस्थान व्यतिरीक्त अपटन यांनी आयपीएलमध्ये पुणे आणि दिल्लीच्या संघाला प्रशिक्षण दिलं आहे. अपटन यांचा अनुभव हा आमच्या संघासाठी अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी आम्ही अपटन यांच्या हाती संघाची कमान सोपवत असल्याचं राजस्थान संघाच्या प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. अपटन हे 2011 साली भारताच्या विश्वचषक विजेत्या संघाचे सहायक प्रशिक्षक म्हणून काम पाहत होते. त्यामुळे अपटन यांच्या मार्गदर्शनाखाली राजस्थानचा संघ कशी कामगिरी करतोय याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

Story img Loader