राजस्थान रॉयल्स संघाच्या ताफ्यात आणखी एका प्रशिक्षकाची भर पडली आहे. गुरुवारी संघाच्या व्यवस्थापनाने ऑस्ट्रेलियाच्या स्थानिक क्रिकेटमधील माजी खेळाडू रॉब कॅसल यांची जलदगती गोलंदाजांचे प्रशिक्षक म्हणून नेमणूक केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या स्थानिक क्रिकेटमध्ये आणि आयर्लंड संघाच्या अनेक जलदगती गोलंदाजांना कॅसल यांनी मार्गदर्शन केले आहे.

कॅसल यांचा अनुभव राजस्थानच्या गोलंदाजांसाठी महत्वाचा ठरु शकेल. सध्या राजस्थानच्या संघात अनेक महत्वाचे जलदगती गोलंदाज आहेत. त्यांच्याकडून अधिक चांगली कामगिरी करुन घेण्याचं काम कॅसल यांच्या खांद्यावर असणार आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस आयपीएलच्या आगामी हंगामाला सुरुवात होणार आहे, त्यामुळे राजस्थानचा संघ कशी कामगिरी करतोय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Story img Loader