आयपीएलच्या आगामी हंगामासाठी राजस्थान रॉयल्स संघ सध्या आपल्या संघाची पुनर्बांधणी करण्याच्या तयारीत आहे. यासाठी पॅडी अपटन यांच्याजागी संघ प्रशासन नवीन प्रशिक्षकांच्या शोधात आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंग्लंडचे माजी मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांना मुख्य प्रशिक्षकपदी नेमण्यात राजस्थानचं संघ व्यवस्थापन उत्सुक आहे.

अजिंक्य रहाणे आणि स्टिव्ह स्मिथ यांच्या नेतृत्वाखाली राजस्थानचा संघ गेल्या हंगामात फारशी चांगली कामगिरी करु शकला नव्हता. प्ले-ऑफमध्ये दाखल होण्याचं राजस्थानचं स्वप्न अपुरच राहिलं. गुणतालिकेत राजस्थानचा संघ सातव्या स्थानावर राहिला होता. त्यामुळे फ्लॉवर यांच्या मार्गदर्शनाखाली राजस्थान रॉयल्स आगामी हंगामाची नव्याने सुरुवात करण्याच्या प्रयतन्ता आहे.

इंग्लंडचे माजी खेळाडू अँड्रू स्ट्रॉस आणि क्लाईव्ह वूडवॉर्ड यांनी फ्लॉवर यांचं नाव प्रशिक्षपदासाठी सुचवलं होतं. फ्लॉवर यांच्याकडे आंतरराष्ट्रीय आणि टी-२० क्रिकेट लिगमध्ये प्रशिक्षणाचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे आगामी हंगामासाठी राजस्थान संघाच्या प्रशिक्षकपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Story img Loader