आतापर्यंत स्पर्धेत अपाराजित राहीलेला राजस्थान रॉयल्स आणि आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा संघ रविवारी अंतिम फेरीत एकमेकांना भिडतील ते चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० स्पर्धेचे जेतेपद पटकावण्यासाठीच. मुंबई इंडियन्सचा सचिन तेंडुलकर आणि राजस्थानचा कर्णधार राहुल द्रविड हे दोन दिग्गज खेळाडू अंतिम फेरीच्या केंद्रस्थानी असतील.
राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत स्पर्धेतील एकही सामना गमावलेला नाही. अजिंक्य रहाणे आणि शेन वॉटसन चांगल्या फॉर्मात आल्याने राजस्थानची फलंदाजीची चिंता मिटली असेल. गोलंदाजीमध्ये प्रवीण तांबेसारखा गुणवान गोलंदाज त्यांच्याकडे अजून तो जबरदस्त फॉर्मात आहे.
उपांत्य फेरीत सचिन तेंडुलकर आणि ड्वेन स्मिथ ही सलामीची जोडी फॉर्मात आल्याने अंतिम फेरीतही त्यांच्याकडून दमदार सलामीची अपेक्षा असेल. त्याचबरोबर रोहित शर्माही सातत्यपूर्ण फलंदाजी करत आहे, पण किरॉन पोलार्डला अजूनही सूर गवसला नसून हीच मुंबईसाठी चिंतेची बाब असेल.

Story img Loader