राजस्थान रॉयल्स स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तीनही खेळाडूंविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करणार आहे. मात्र, आयपीएलमधील भ्रष्टाचाराविषयी बीसीसीआयने आपली कमजोरी दाखवत आम्ही कायद्यानुसार वागणार आहोत असे सूचीत केले आहे.
चेन्नई येथे आज पार पडलेल्या बीसीसीआयच्या बैठकीनंतर अध्यक्ष श्रीनिवासन यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर खुलासा करत सांगितले, “आम्ही राजस्थान रॉयल्सच्या मालकांना व व्यवस्थापनाला घडलेल्या घटनेची माहिती देण्यासाठी बैठकीला निमंत्रित केले होते. राजस्थान रॉयल या खेळाडूंवर गुन्हा दाखल करणार असल्याचे त्यांनी आम्हाला कळवले आहे.”
आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अटक असलेल्या श्रीशांत, अजित चंडिला आणि अंकित चव्हाण यांच्या विरोधात राजस्थान रॉयल्सने आगोदर अंतर्गत तपासणी सुरू केली आहे, मात्र, आता पोलिसांत या तिघांविरेधात लोकांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्याचे संघ व्यवस्थापनाने ठरवले आहे.
आता पर्यंत मात्र संघव्यवस्थापन पोलिसांकडे गेले नसल्याचा अहवाल आहे.

Story img Loader