आयपीएल २०२१ च्या लिलावापूर्वी राजस्थान संघानं विस्फोटक फलंदाज रॉबिन उथप्पाला धोनीच्या चेन्नई संघाबरोबर ट्रेड केलं आहे. चेन्नई संघानं गुरुवारी रात्री ट्विट करत ही माहिती दिली आहे. चेन्नईच्या चाहत्यानं रॉबिन उथप्पाचं सोशल मीडियावर स्वागत केलं आहे. राजस्थान आणि चेन्नई संघामध्ये तीन कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचं समजतेय. स्मिथनंतर उथप्पालाही सोडल्यामुळे लिलावापूर्वी राजस्थान संघाकडे पैसे वाढले आहेत. स्टीव स्मिथच्या नेतृत्वात राजस्थानकडून खेळताना उथप्पाचा मागील आयपीएल हंगाम खराब गेला होता. राजस्थान संघानं रॉबिनचे आभार मानले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

आणखी वाचा- क्रृणालबरोबरचा वाद पडला महागात, BCA नं दीपक हुड्डावर केली मोठी कारवाई

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली छाप सोडणारा आणि स्थानिक क्रिकेटमध्ये विस्फोटक फलंदाजी करणाऱ्या रॉबिन उथप्पाला राजस्थान संघानं तीन कोटी रुपयांना खरेदी केलं होतं. राजस्थान संघापूर्वी रॉबिन उथप्पा कोलकाता, मुंबई, आरसीबी आणि पुणे संघाकडूनही खेळला आहे.

आणखी वाचा- IND vs ENG : भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर

२००८ पासून आयपीएलमध्ये विस्फोटक फलंदाजी करणाऱ्या रॉबिनच्या नावावर ४६०७ धावा आहेत. २०१४ मध्ये ऑरेंज कॅपही मिळाली होती. त्यानं केकेआरसाठी ६६० धावा चोपल्या होत्या. २०१४ मध्ये कोलकाता संघाच्या विजयात रॉबिनचा सिंगाचा वाटा होता.

Story img Loader