IPL, Rajasthan Royals on Jos Buttler: जगभरात टी२० क्रिकेटच्या वाढत्या लोकप्रियतेसह, अनेक टी२० फ्रँचायझी खेळाडूंसोबत दीर्घकालीन करार करत आहेत. या टी२० फ्रँचायझींमध्ये आयपीएल फ्रँचायझी आघाडीवर आहे. इंडियन प्रीमिअर लीगमधील फ्रँचायझी मध्ये इंग्लंडचे खेळाडू इतर देशांच्या खेळाडूंमध्ये आघाडीवर आहेत. अलीकडेच अशी बातमी आली होती की मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला वार्षिक करारावर साईन करण्याच्या तयारीत आहे, आता या यादीत आणखी एक नाव जोडले गेले आहे इंग्लंडच्या मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार जोस बटलर.
आयपीएल फ्रँचायझी राजस्थान रॉयल्स बटलरसोबत ४ वर्षांचा करार करण्याची तयारी करत आहे. माहितीसाठी! बटलर २०१८ पासून आयपीएलमधील या संघाचा भाग आहे. राजस्थान रॉयल्सकडून तो सलामीवीर म्हणून फलंदाजी करतो, बटलरने त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक नवीन स्थान निर्माण केले आहे. आक्रमक फलंदाज म्हणून तो राजस्थान रॉयल्सकडून खेळताना नावारूपाला आला.
असे समजले जाते की ही ऑफर अद्याप बटलरला औपचारिकपणे सादर केली गेली नाही. टी२० विश्वचषक विजेता कर्णधार हा करार स्वीकारण्याच्या मूडमध्ये आहे की नाही हे ही स्पष्ट नाही, असे वृत्त द डेली टेलिग्राफने दिले आहे. या करारात त्याला किती रक्कम मिळणार याचीही माहिती नाही, पण त्याची कमाई क्षमता पाहता बटलरला दरवर्षी लाखो पौंड मिळू शकतात, म्हणजेच जर त्याने हा प्रस्ताव स्वीकारला तर तो कोट्याधीश होणार हे निश्चित.
माहितीसाठी की, यापूर्वी जेव्हा अशी बातमी आली होती की मुंबई इंडियन्स जोफ्रा आर्चरला वार्षिक करारावर घेणार आहे, तेव्हा त्याला दरवर्षी १० कोटी रुपये देण्याची चर्चा होती. मात्र, या करारावर स्वाक्षरी केल्यानंतर खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी फ्रँचायझींची परवानगी घ्यावी लागणार आहे. बटलरबद्दल सांगायचे तर, आयपीएल व्यतिरिक्त पारल रॉयल्ससाठी दक्षिण आफ्रिका टी२० (SA20) लीगमध्ये राजस्थान आधारित फ्रँचायझीसाठी खेळतो. राजस्थान रॉयल्सचाही कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये बार्बाडोस रॉयल्स नावाचा संघ आहे, जर बटलरने हा करार केला तर तो कॅरेबियन प्रीमियर लीगमध्येही खेळताना दिसू शकतो.
बटलरची आयपीएलमधील कामगिरी
जोस बटलरने यापूर्वी इंडियन प्रीमियर लीगमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. २०२२मध्ये, बटलरने राजस्थान रॉयल्ससाठी १७ सामन्यांमध्ये ५७.५३च्या सरासरीने ८६३ धावा केल्या. जरी त्याचे हे वर्ष फारसे चांगले नव्हते. आरआरला बटलरकडून खूप आशा होत्या, पण गेल्या वर्षी म्हणजे आयपीएल २०२३ मध्ये त्याने संघासाठी १४ सामन्यांत २८च्या सरासरीने केवळ ३९२ धावा केल्या. असे असूनही, राजस्थान रॉयल्सला बटलरच्या क्षमतेबद्दल अजिबात शंका नाही. या इंग्लिश फलंदाजाने आंतरराष्ट्रीय स्तरावर आतापर्यंत आयपीएलमधील ९६ सामन्यांमध्ये ३२२३ धावा आणि टी२० क्रिकेटमध्ये १०६ सामन्यांमध्ये २७१३ धावा केल्या आहेत.