India vs England 2nd Test Match Updates : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यातून रजत पाटीदारला भारताकडून कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. या सामन्यात रजतशिवाय कुलदीप यादव आणि मुकेश कुमार यांचाही प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे.

रजत पाटीदारला मिळाली पदार्पणाची संधी –

टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानने हस्ते रजत पाटीदारला पदार्पणाची कॅप मिळाली आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिका दौऱ्यात रजत पाटीदारला टीम इंडियासाठी वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. रजत पाटीदारने प्रथम श्रेणी क्रिकेट आणि आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केली आहे, ज्यामुळे त्याला टीम इंडियामध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. त्याने अलीकडेच इंग्लंड लायन्सविरुद्धही धावा केल्या. पाटीदारने ५५ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ४५ च्या सरासरीने ४००० धावा केल्या आहेत. या काळात त्याने १२ शतके आणि २२ अर्धशतके झळकावली आहेत.

IND vs ENG Gautam Gambhir played a master stroke as Harshit Rana to beat England Pune T20I match
IND vs ENG : गौतम गंभीरच्या मास्टर स्ट्रोकमुळे भारताने मारली बाजी! ‘हा’ निर्णय ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
India Beat England by15 Runs and Wins T20I Series
IND vs ENG: पुण्यनगरीत टीम इंडियाने कमावलं मालिका विजयाचं पुण्य; तिसऱ्या टी२० सामन्यात विजयासह विजयी आघाडी
Harshit Rana makes T20I debut as concussion substitute against England
IND vs ENG: हर्षित राणाचं चौथ्या टी-२० सामन्यादरम्यान अनोखं पदार्पण, पहिल्याच षटकात घेतली विकेट; नेमकं काय घडलं?
India vs England 4th T20I match today in Pune sports news
फलंदाजांकडून कामगिरी उंचावण्याची अपेक्षा; भारत-इंग्लंड चौथा ट्वेन्टी२० सामना आज पुण्यात
We always learn from a T20I Game Says Suryakumar Yadav after defeat against England in 3rd T20I
IND vs ENG : ‘…म्हणून पराभव पदरी पडला’, सूर्यकुमार यादवने सांगितला राजकोट सामन्यातील टर्निंग पॉइंट
IND vs ENG Tilak Varma reveals Head Coach Gautam Gambhir advice after Chennai T20I win
IND vs ENG : ‘काहीही झालं तरी…’, तिलक वर्माने विजयानंतर गौतम गंभीरने दिलेल्या गुरुमंत्राचा केला खुलासा
Tilak Verma and Suryakumar Yadav victory celebration video goes viral after India won Chepauk
Tilak Verma : तिलकच्या वादळी खेळीने जिंकलं सूर्याचं मन, वाकून सलाम करतानाचा VIDEO होतोय व्हायरल

जडेजा, राहुल आणि सिराज बाहेर –

रवींद्र जडेजा आणि केएल राहुल दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर पडले आहेत. तसेच वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला या सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे. या तीन खेळाडूंच्या जागी रजत पाटीदार, कुलदीप यादव आणि मुकेश कुमार यांचा संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे.

हेही वाचा – इंग्लंडच्या आक्रमणाला प्रत्युत्तर देण्यासाठी नव्या योजनांसह सज्ज! दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाच्या दमदार पुनरागमनाचा भरतला विश्वास

भारतीय संघाचा युवा फलंदाज रजत पाटीदारचे भारताकडून कसोटी खेळण्याचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे. त्याला केएल राहुलच्या जागी भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली आहे. रजत देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. अशा स्थितीत पदार्पणातही त्याला बॅटने चमत्कार करायला आवडेल. संघात प्रवेशासाठी रजत पाटीदार आणि सरफराज खान यांच्यात रंजक लढत झाली. मात्र, कर्णधार रोहित शर्माने सरफराजच्या जागी रजतला संघात स्थान दिले आहे.

दुसऱ्या कसोटीसाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –

भारताची प्लेइंग इलेव्हन – यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, श्रीकर भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मुकेश कुमार, कुलदीप यादव.

हेही वाचा – Video: सचिन ‘तेंडुलकर’ला भेटतो तेव्हा…! खुद्द मास्टर ब्लास्टरनंच शेअर केला व्हिडीओ; चाहत्याच्या चेहऱ्यावर तरळल्या लाखमोलाच्या भावना

इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन – जॅक क्रोली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (यष्टीरक्षक), रेहान अहमद, टॉम हार्टली, शोएब बशीर, जेम्स अँडरसन.

Story img Loader