Mumbai vs MP SMAT Final Highlights: मुंबईने १५ डिसेंबरला झालेल्या अंतिम सामन्यात मध्य प्रदेशचा पाच गडी राखून पराभव करत सय्यद मुश्ताक अली करंडक जिंकला. मुंबईच्या संघाने सुरुवातीच्या धक्क्यांतून सावरत १७५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना १७.५ षटकांत पाच गडी गमावून १८० धावा करत विजय मिळवला. थोड्या कठीण खेळपट्टीवर कर्णधार रजत पाटीदारच्या नाबाद ८१ धावांच्या खेळीमुळे मध्य प्रदेशने २० षटकांत आठ गडी गमावून १७४ धावा केल्या. अंतिम सामन्यात मध्य प्रदेशच्या डावात कर्णधार रजत पाटीदार तिसऱ्या पंचाच्या निर्णयावर नाराज दिसला आणि त्याने क्रीज सोडण्यास नकार दिला.

मध्य प्रदेशच्या डावातील शेवटच्या चेंडूवर रजत पाटीदारला शार्दुल ठाकूरने ऑफ स्टंपच्या बाहेर फुल चेंडू टाकला. रजत ऑफ स्टंपच्या बाहेर गेला होता पण असे असूनही अंपायरने त्याला वाइड दिले. मुंबईने या निर्णयाच्या विरोधात तिसऱ्या पंचांकडे अपील केली, जिथे पंचांनी तो कायदेशीर चेंडू असल्याचे घोषित केले.

हेही वाचा – IND vs AUS: पुन्हा मंकीगेट प्रकरण? जसप्रीत बुमराहवर महिला कमेंटेटरने केली वर्णभेदात्मक टिप्पणी, गाबा कसोटीत नव्या वादाला फुटलं तोंड

u

मात्र, मध्य प्रदेशचा कर्णधार पंचांच्या निर्णयावर खूश नव्हता आणि त्याने मैदानावरील पंचांना चेंडू कुठे पिच झाला आहे हे पाहण्यास सांगितले. यानंतर मध्य प्रदेशच्या कर्णधाराने स्क्वेअर लेग अंपायरशी चर्चा केली आणि थर्ड अंपायरला पुन्हा तपासून निर्णय घेण्यास भाग पाडले. चेंडू मार्करच्या बाहेर पिच झालेला असल्याने, रजत पाटीदारने ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन चेंडू खेळल्यानंतरही तो वाईड चेंडू देणे अपेक्षित होतं.

हेही वाचा – Syed Mushtaq Ali Trophy 2024: सूर्यांश शेडगेची निर्णायक खेळी; सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत मुंबई ‘अजिंक्य’

तिसरे पंच अनंतपद्मनाभन यांनी पुन्हा तपासल्यानंतर ऑन एअर म्हणाले, माफ करा चेंडू पॉपिंग क्रीझच्या बाहेर पिच झाला होता, मला ते दिसलं नाही. तिसऱ्या पंचांनी निर्णय बदलल्यानंतर मध्य प्रदेशला आणखी एक चेंडू मिळाला. यावर मध्य प्रदेशचा कर्णधार रजत पाटीदारने षटकार ठोकला. त्याने ४० चेंडूत ६ षटकारांच्या मदतीने ८१ धावा केल्या. पण रजत पाटीदारची ही निर्णायक खेळी संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकली नाही आणि मुंबईच्या संघाने सामना आपल्या नावे केला.

Story img Loader