भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे सरचिटणीस राजीव मेहता हे स्कॉटलंड पोलिसांविरुद्ध अब्रूनुकसानीचा दावा करण्याच्या विचारात आहेत. स्कॉटलंड पोलिसांनी मेहता यांच्यावर मद्यपान करीत मोटार चालविल्याचा आरोप ठेवला होता. मात्र सबळ पुराव्याअभावी मेहता यांची निदरेष मुक्तता करण्यात आली होती.
मेहता हे ग्लासगो (स्कॉटलंड) येथे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेनिमित्त गेले होते. त्या वेळी त्यांच्यावर आरोप ठेवत स्कॉटलंड पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. ‘‘या वृत्ताने माझी नाहक बदनामी झाली असून पोलिसांविरुद्ध मानहानीचा खटला दाखल करण्याचा माझा विचार आहे. माझ्यावर आरोप ठेवण्यात आले होते, तेव्हाही मी निदरेष होतो आणि आताही मी निदरेष आहे. या संदर्भात खूप संभ्रम निर्माण झाला होता. मात्र आता संशयाचे ढग दूर झाले आहेत,’’ असे मेहता यांनी सांगितले.
स्कॉटलंड पोलिसांकडून पुन्हा या प्रकरणाची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे काय, असे विचारले असता मेहता म्हणाले, ‘‘कोणत्याही चौकशीला मी घाबरत नाही. मी कोणतेही गैरकृत्य केलेले नाही.’’

Story img Loader