Which countries are represented by athletes of Indian origin in the Paris Olympics : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेला २६ जुलैपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेसाठी भारत ११७ खेळाडूंची तुकडी पाठवत आहे. तथापि, भारत केवळ भारतीय तुकडीपुरता मर्यादित राहणार नाही. काही भारतीय वंशाचे खेळाडू अमेरिका, फ्रान्स आणि कॅनडासारख्या देशांचे प्रतिनिधित्व करतील. अशा खेळाडूंची एकूण संख्या पाच आहे. भारतीय वंशाचे दोन खेळाडू अमेरिकेचे प्रतिनिधित्व करतील, फ्रान्स, सिंगापूर आणि कॅनडाचे प्रत्येकी एक खेळाडू प्रतिनिधित्व करतील. हे पाच भारतीय वंशाचे कोण आहेत? त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.

राजीव राम टेनिसमध्ये अमेरिकेचे प्रतिनिधित्व करणार –

या यादीतील सर्वात प्रसिद्ध ॲथलीट ४० वर्षीय राजीव रामचा जन्म अमेरिकेतील डेन्व्हर येथे झाला. त्यांचे आई-वडील बंगळुरुचे आहेत. रामचे वडील राघव यांचे एप्रिल २०१९ मध्ये स्वादुपिंडाच्या कर्करोगामुळे निधन झाले. ते वनस्पतिशास्त्रज्ञ होते. त्याची आई सुषमा शास्त्रज्ञ आहेत. पण रामने अभ्यासाची परंपरा मोडून टेनिस खेळायचे ठरवले. अमेरिकेकडून खेळताना राजीवने बरेच यश मिळवले आहे. त्याने चार पुरुष दुहेरी आणि एक मिश्र दुहेरीसह पाच ग्रँड स्लॅम विजेतेपदे जिंकली आहेत. त्याने २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये मिश्र दुहेरीत व्हीनस विल्यम्ससह जेतेपद पटकावले. तो पुरुष दुहेरी स्पर्धेत सहभागी होणार आहे.

Canada
Indian students in Canada : भारतातून कॅनडात गेलेल्या २० हजार विद्यार्थांची महाविद्यालयांना दांडी, आकडेवारी आली समोर
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
IND vs ENG Pakistani Origin England Bowler Saqid Mahmood Denied Visa To India
IND vs ENG: पाकिस्तान वंशाच्या इंग्लंड खेळाडूला भारत व्हिसा नाकारला, भारत दौऱ्यात खेळू शकणार?
IND vs ENG Aakash Chopra questioned absence of Shivam Dube from India squad for the upcoming T20I series
IND vs ENG : भारताच्या टी-२० संघात CSK च्या खेळाडूला संधी न मिळाल्याने माजी खेळाडू संतापला, उपस्थित केले प्रश्न
Pakistani Cricketer Called Indian Players Kafirs Mohinder Amarnath Recounts 1978 Tour of Pakistan in His Memoir
भारतीय खेळाडू ‘काफिर’; पाकिस्तानी खेळाडूची टीम इंडियावर आगपाखड, भारताच्या माजी खेळाडूने सांगितला ‘तो’ प्रसंग
Will Pakistan lose hosting rights of Champions Trophy cricket tournament
चँपियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तान गमावणार? भारताच्या दबावाचा किती परिणाम?
Border-Gavaskar Trophy India defeat against Australia sport news
‘डब्ल्यूटीसी’तील आव्हानही संपुष्टात
Sunil Gavaskar upset that he was Not called to hand over Border Gavaskar Trophy to Australia IND vs AUS
IND vs AUS: सुनील गावस्करांचा ऑस्ट्रेलियात अपमान? नाराजी व्यक्त करत म्हणाले, “मी भारतीय आहे म्हणून…”

प्रितिका पावडे टेनिसमध्ये फ्रान्सचे प्रतिनिधित्व करणार –

प्रितिकाच्या वडिलांचा जन्म पुद्दुचेरी येथे झाला. २००३ मध्ये लग्न केल्यानंतर ते पॅरिसला गेले. एका वर्षानंतर फ्रान्सच्या राजधानीत प्रितिकाचा जन्म झाला. स्वतः टेबल टेनिसपटू असलेल्या प्रितिकाच्या वडिलांनी वयाच्या सहाव्या वर्षी तिला टेबल टेनिसची ओळख करून दिली. अवघ्या १६ व्या वर्षी, तिने टोकियो येथे तिच्या पहिल्या ऑलिम्पिक गेम्समध्ये भाग घेतला. १९ वर्षीय खेळाडू रसायनशास्त्र आणि पर्यावरण शास्त्राचा शिक्षण घेत आहे. प्रितिका महिला एकेरी आणि महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरी स्पर्धांमध्येही भाग घेणार आहे.

हेही वाचा – Team India : सूर्यकुमार यादव चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार नाही… आकाश चोप्राने का केला असा दावा ? जाणून घ्या

कनक झा टेबल टेनिसमध्ये अमेरिकेचे प्रतिनिधित्व करणार –

पॅरिस गेम्समध्ये सहभागी होणारा आणखी एक भारतीय वंशाचा खेळाडू यूएसए टेबल टेनिसपटू कनक झा असेल. कनकची आई करुणा ही मुंबईची आहे, तर वडील अरुण कोलकाता आणि प्रयागराजमध्ये मोठे झाले आहेत. दोघेही आयटी प्रोफेशनल आहेत. कॅलिफोर्नियातील मिलपिटास येथील इंडिया कम्युनिटी सेंटरमध्ये टेबल टेनिसबद्दल कनकला रुची निर्माण झाली. त्याची मोठी बहीण प्राची ही देखील टेबल टेनिस खेळाडू आहे. काही वेळातच त्याने त्याच्या वयाच्या दुप्पट खेळाडूंना हरवायला सुरुवात केली. तो पॅरिस येथे होणाऱ्या पुरुष एकेरीच्या स्पर्धेत भाग घेणार आहे.

ॲथलेटिक्समध्ये शांती परेरा सिंगापूरचे प्रतिनिधित्व करणार –

सिंगापूरची स्प्रिंट क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेल्या वेरोनिका शांती परेराची मुळे केरळमध्ये आहेत. आजी-आजोबा तिरुअनंतपुरमजवळील वेट्टुकड येथील होते. मात्र शांतीच्या आजोबांना सिंगापूरमध्ये नोकरी मिळाल्यानंतर या जोडप्याने भारत देश सोडला. गेल्या वर्षी, परेराने आशियाई क्रीडा स्पर्धेत ट्रॅक आणि फील्ड पदकांचा ४९ वर्षांचा दुष्काळ संपवला. तिने महिलांच्या १०० मीटर शर्यतीत रौप्य पदक जिंकले. सिंगापूर स्पोर्ट्स अवॉर्ड्समध्ये ‘स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर’ पुरस्कार मिळालेली परेरा पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभात लायन सिटीसाठी दोन ध्वजधारकांपैकी एक असेल. पॅरिसमध्ये होणाऱ्या महिलांच्या १०० मीटर शर्यतीत ती भाग घेणार आहे.

हेही वाचा – Shubman Gill : ‘एक दिवस शुबमन तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचे नेतृत्त्व करेल…’, माजी बॅटिंग कोचचे मोठे वक्तव्य

अमर धेसी कुस्तीमध्ये कॅनडाचे प्रतिनिधित्व करणार –

अमरवीरचा जन्म कॅनडाच्या पश्चिम किनाऱ्यावरील ब्रिटिश कोलंबियाच्या सरे येथे बलबीर धेसी यांच्या घरी झाला. अमरचे वडील, माजी ग्रीको-रोमन राष्ट्रीय चॅम्पियन, पंजाबमधील जालंधर जिल्ह्यातील संघवाल गावचे रहिवासी आहेत. बलबीर यांनी एनआयएस पटियाला येथे प्रशिक्षण घेतले होते आणि त्यांना पंजाब पोलिसात नोकरीही मिळाली होती, परंतु १९७९ मध्ये ते चांगल्या संधींच्या शोधात कॅनडाला गेले. तेथे पोहोचल्यानंतर त्यांनी एका कारखान्यात काम केले. १९८५ मध्ये सरे येथे तरुणांसाठी खालसा रेसलिंग क्लब सुरू केला. अमरने वयाच्या पाचव्या वर्षापासून वडील आणि मोठा भाऊ परमवीर यांच्यासोबत सराव केला आणि वयाच्या आठव्या वर्षी पहिल्या स्पर्धेत भाग घेतला.

हेही वाचा – Paris Olympics 2024 : सलग पाचव्या ऑलिम्पिकमध्ये पदकं जिंकण्यासाठी कुस्तीपटू सज्ज! सरकारने खेळाडूंवर किती केलाय खर्च?

योगेश्वर दत्तचे कुस्तीचे व्हिडीओ पाहण्याची आवड –

लंडन गेम्समधील कांस्यपदक विजेता योगेश्वर दत्तचे कुस्तीचे व्हिडिओ पाहण्याची आवड असलेल्या अमरने टोकियो २०२० मध्ये ऑलिम्पिक पदार्पण केले, जिथे तो पुरुषांच्या १२५ किलो फ्रीस्टाइल स्पर्धेत १३व्या स्थानावर राहिला. त्याने एका वर्षानंतर पॅन अमेरिकन चॅम्पियनशिपमध्ये त्याचे पहिले वरिष्ठ सुवर्णपदक जिंकले आणि नंतर बर्मिंगहॅममधील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत १२५ किलो वजनात सुवर्णपदक जिंकले. २८ वर्षीय खेळाडू पुरुषांच्या १२५ किलो फ्रीस्टाइल स्पर्धेत सहभागी होणार आहे.

Story img Loader