राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक प्राप्त कुस्तीपटू राजीव तोमरला जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत पात्रता फेरीतच पराभवाला सामोरे जावे लागले. पात्रता फेरीत १२५ किलोग्रॅम फ्रीस्टाइल प्रकारात कोरियाच्या रयाँग स्युंगने राजीवला ३-१ असे नमवले. कॅनडाच्या क्लिओपस नक्युबेने ७० किलोग्रॅम फ्रीस्टाइल प्रकारात भारताच्या अरुणचा ४-० असा धुव्वा उडवला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अन्य खेळाडूंमध्ये ५७ किलो वजनी गटात राहुल बाळासाहेब अवारेने पात्रता फेरीत तुर्कीच्या पेकर अहमेटवर ४-० असा विजय मिळवला मात्र पहिल्या फेरीत मंगोलियाच्या बेखबयार इर्डेनेबॅटने त्याच्यावर ३-१ अशी मात केली. नरेश कुमारने पात्रता फेरीत गिनिआ बिसायुच्या क्विंटिनो इंटिपेवर ५-० असा विजय मिळवला. मात्र मुख्य फेरीत क्युबाच्या रिइनरिस सलासने त्याच्यावर ३-१ अशी मात केली. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पाश्र्वभूमीवर भारताने या स्पर्धेसाठी दुय्यम संघाची निवड केली आहे. सुशील कुमारसह मुख्य कुस्तीपटूंनी या स्पर्धेतून माघार घेतली आहे.