‘दि ग्रेट खली’नंतर भारताकडून आता ‘डब्लूडब्लूई’मध्ये राजेश कुमार सहभागी होणार आहे. मुख्यम्हणजे, दि ग्रेट खली पेक्षाही उंच आणि तितकाच धिप्पाड आहे.
अंबाला जिल्ह्यातील धानोरा गावात राहणाऱया राजेश कुमार याची उंची तब्बल ७ फुट ५ इंच इतकी आहे. तसेच त्याला दोन लहान मुलेही आहेत. याआधी मनोज शेती करत होता. खलीने आपल्या धिप्पाड शरीराला स्वत:ची ओळख बनवून ‘डब्लूडब्लूई’मध्ये जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळविल्यानंतर राजेशलाही त्यातून प्रेरणा मिळाली असल्याचे तो सांगतो. त्यामुळे आपणही भारताकडून डब्लूडब्लूईमध्ये सहभागी व्हावे अशी राजेशची इच्छा झाली व त्याने त्यासाठीचा सराव सुरू केला. यापुढच्या सरावासाठी राजेश आता जपानला जाणार आहे. तेथील सराव पूर्ण झाल्यानंतर राजेश कुमार लवकरच डब्लूडब्लयूईमध्ये दिसेल.
राजेश कुमारचे वजन सध्या १५२ किलोग्रॅम इतके आहे. राजेशला त्याच्या रोजच्या आहाराबद्दल विचारले असता मिळालेली माहिती नक्कीच डोळे विस्फारणारी आहे.
राजेश कुमार दररोज तब्बल ४० अंडी खातो, सोबत ५-६ किलो चिकन, सात लिटर दूध, ६-७ किलो फळे आणि ३० पेक्षा जास्त चपात्या. याबद्दल राजेश स्मितहास्यात प्रतिक्रीया देतो की, हा सगळा माझा आहार मोठा असल्याने मी दिवसातून ७ ते ८ वेळा जेवतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा