Rajeev Shukla Visited Samadhi Of Luv: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी प्रभू रामचंद्रांचे पुत्र ‘लव’ यांच्या पाकिस्तानस्थित समाधीला भेट दिली आहे. शुक्ला दक्षिण अफ्रिका व न्यूझीलंड यांच्यामधील चॅम्पियन्स ट्रॉफीचा उपांत्य फेरीचा सामना बघण्यासाठी लाहोरला गेले होते, त्यावेळी त्यांनी लाहोरमधल्या प्राचीन किल्ल्यात असलेल्या ‘लव’ यांच्या समाधीचे दर्शन घेतले.
या भेटीची व समाधी दर्शनाची छायाचित्रे शुक्ला यांनी एक्सच्या माध्यमातून शेअर केली आहेत. या पोस्टमध्ये शुक्ला म्हणतात, “लव यांच्या नावावरूनच लाहोर हे नाव या शहराला मिळाले आहे. या समाधीस्थळी भेट देऊन प्रार्थना करण्याची मला संधी मिळाली. माझ्यासह पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन नक्वी होते. नक्वी हे या समाधीच्या जीर्णोद्धाराचं काम बघत आहेत. मोहसीन हे ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी प्रथम यामध्ये लक्ष घातलं व जीर्णोद्धाराच्या कामाला सुरुवात केली.”
लाहोर नावामागची गोष्ट
दुसऱ्या एका पोस्टमध्ये शुक्ला म्हणतात, “लाहोरच्या महापालिकेचे दस्तावेज नमूद करतात की हे शहर प्रभू रामचंद्रांच्या पुत्राच्या ‘लव’ यांच्या नावे वसवण्यात आले आहे. तर प्रभू रामचंद्रांचा दुसरा पुत्र कुश याच्या नावे कसूर हे शहर वसवण्यात आले आहे.” पाकिस्तान सरकारनंही या वास्तवाचा स्वीकार केल्याचे शुक्ला यांनी म्हटले आहे.
शुक्ला यांनी काल सांगितले की, “हे अत्यंत सुस्पष्ट आहे की भारत व पाकिस्तान या दोघांमधील क्रिकेट एकमेकांच्या देशात पुन्हा सुरू करण्यासाठी भारत सरकारची परवानगी आवश्यक आहे.”
पाकिस्तानातील प्रसारमाध्यमांशी बोलताना शुक्ला म्हणाले दोन्ही देशांतील क्रिकेट रसिकांना त्रयस्थ देशापेक्षा, एकमेकांच्या देशात दोन्ही संघात झालेले सामने हवे आहेत. “आम्ही आमचं म्हणणं सरकारसमोर मांडतो पण सर्व बाबींची चाचपणी करून सरकार अंतिम निर्णय घेते. अनेक अंगांनी विचार करून सरकार निर्णय घेत असतं. आणि हा त्यांचा अंतर्गत मामला आहे,” शुक्ला यांनी स्पष्ट केले.
भारत-न्यूझीलंड फायनल पावसामुळे रद्द झाली तर कोण ठरणार विजेता? काय आहे ICCचा नियम?
Accuweather च्या अहवालानुसार तर दुबईमध्ये ९ मार्चला पाऊस पडण्याची शक्यता नाही. पण तरीही पाऊस पडला आणि सामना थांबला तर आयसीसीने अंतिम सामन्यासाठी राखीव दिवसाचीही व्यवस्था केली आहे. म्हणजे जर ९ मार्चला सामना होऊ शकला नाही तर तो १० मार्चला सामना खेळवला जाईल. जर ९ मार्चला अर्धा सामना खेळवण्यात आला आणि पावसामुळे सामना थांबवावा लागला तर १० मार्चला पुन्हा तिथूनच सामना खेळवण्यात येईल. जेणेकरून दोन्ही संघांना जेतेपद पटकावण्याची बरोबरीची संधी मिळेल.