प्रो कबड्डी लीगचा तिसरा हंगाम जानेवारीत
स्टार स्पोर्ट्स प्रो कबड्डी लीगचा तिसरा हंगाम पुढील वर्षी जानेवारी महिन्यात बहरणार असून, यात आठ संघांचा सहभाग असेल, अशी माहिती संयोजकांनी दिली आहे. भारताचा कर्णधार राकेश कुमारचा यु मुंबा संघात समावेश करण्यात आला आहे.
प्रो कबड्डीच्या दुसऱ्या हंगामातील २० खेळाडूंचे संघ बदलण्यात आले आहेत. यानुसार मागील हंगामातील सर्वात मौल्यवान खेळाडू मनजीत चिल्लर हा पुणेरी पलटणकडून बंगळुरू बुल्सकडे जाणार आहे. याशिवाय अजय ठाकूरलाही पुण्याच्या संघात स्थान देण्यात आले आहे. याशिवाय दीपक हुडा, जसमेर सिंग, सुरजीत नरवाल, धरमराज छेरलाथन, वसिम सज्जड, राजगुरू सब्रम्हण्यम या खेळाडूंचेही संघ बदलण्यात आले आहेत.
अनुप कुमार, काशिलिंग आडके, रविंदर पहल, राहुल चौधरी, सुकेश हेगडे, यान कुन ली, संदीप नरवाल आणि ताई डीऑक ईओम यांचे मात्र संघ कायम ठेवण्यात आले आहे. तिसऱ्या हंगामासाठी १२ अन्य देशांतील २४ खेळाडूंना करारबद्ध करण्यात आले आहे.
राकेश कुमार यु मुंबा संघात
भारताचा कर्णधार राकेश कुमारचा यु मुंबा संघात समावेश करण्यात आला आहे.
Written by झियाऊद्दीन सय्यदझियाउद्दीन सय्यद
आणखी वाचा
First published on: 18-11-2015 at 00:49 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rakesh kumar will play for u mumba team