Rameez Raja on Shoaib Akhtar: अलीकडेच पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने एका टेलिव्हिजन वाहिनीवर कर्णधार बाबर आझमवर जोरदार टीका केली होती. पाकिस्तानी कर्णधाराला इंग्रजी नीट बोलता येत नसल्याने, तो मोठा ब्रँड बनू शकला नाही, असे त्याने म्हटले होते. आता पीसीबीचे माजी अध्यक्ष रमीझ राजाने या माजी क्रिकेटर शोएब अख्तरला भारतीचे उदाहरण देत फटकारले आहे.

ब्रँड होण्यासाठी आधी चांगला माणूस व्हावे लागते –

पाकिस्तानच्या स्थानिक चॅनल बीओएल नेटवर्कवर बोलताना रमीझ राजा म्हणाले, “तो (शोएब अख्तर) सर्वांना सांगतो की… मला वाटतं कामरान अकमलसोबतही त्याचा थोडी फार झाली होती.” यावर अँकरने रमीज राजाला आठवण करून दिली की अख्तरचा शाहिद आफ्रिदीसोबतही झाले होते. आपले बोलणे पुढे चालू ठेवत रमीझ राजा म्हणाले, “म्हणूनच ते ब्रँडबद्दल बोलतात, नाही का, जर तुम्हाला ब्रँड बनायचे असेल तर आधी तुम्हाला चांगला माणूस बनले पाहिजे. माणूस बनल्यानंतर ब्रँड तयार होतो.”

Shreyas Iyer to captain Mumbai Team in Syed Mushtaq Ali Trophy Prithvi Shaw included in Squad Ajinkya Rahane
Shreyas Iyer: श्रेयस अय्यरच्या खांद्यावर ‘या’ संघाने कर्णधारपदाची दिली जबाबदारी! अजिंक्य रहाणेही अय्यरच्या नेतृत्त्वाखाली खेळणार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
prithviraj chavan congress cm
मविआची सत्ता आल्यास पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असणार? स्वतःच उत्तर देताना म्हणाले…
Sharad Pawar on Gautam Adani meeting
Sharad Pawar: “होय, बैठक झाली होती, पण…”, NCP-BJP एकत्र येण्यासाठी अदाणींच्या घरी बैठक; अजित पवारांच्या दाव्यावर शरद पवार म्हणाले…
Mohammad Rizwan Says I am only a captain for toss and presentation
Mohammad Rizwan : ‘मी फक्त टॉस आणि प्रेझेंटेशनसाठी कर्णधार…’, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऐतिहासिक विजयानंतर मोहम्मद रिझवानचे मोठे वक्तव्य
NCP Ajit Pawar group
Nawab Malik : “आम्ही किंगमेकर राहणार, आमच्याशिवाय कोणतंही सरकार…”, अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Amit Shah IMP Statement about CM Post
Amit Shah : ‘महायुतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण?’ अमित शाह म्हणाले, “नेतृत्व…”

रमीझ राजा पुढे म्हणाले, “हे बघा, क्रिकेट सर्किटमध्ये पाकिस्तानच्या पडझडीचे एक कारण हे आहे की आपले सर्वच नाही… पण जे माजी खेळाडू आहेत (शोएब अख्तरसारखे) ते अशा गोष्टींवर बोलून आपल्या क्रिकेटचा ब्रँड खाली खेचतात.”

दूरवर बसून प्रत्येकजण तुमच्याकडे बोट दाखवतो –

रमीझ राजा म्हणाले, “दुर्दैवाने पाकिस्तानमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, ज्यांचे त्याला काम करू दिले जात नाही. आदेश देणे आणि बोट दाखवणे हे केले जाते. पाहा, हे परदेशी नाही. मी कोणाच्याही चुका काढू शकतो. पण उत्तर द्यायला तेव्हाच बांधिल असता, जेव्हा तुम्ही ते काम करण्याचा पंगा घेता. दूरवर बसून प्रत्येकजण तुमच्याकडे बोट दाखवू शकतो. पण तो दुरुस्त करायला येत नाही.”

रमीझ राजाने हे सांगताच अँकर म्हणाला, ‘याच मुलाखतीत शोएब भाई म्हणाले होते की, जर मी पीसीबी (पाकिस्तान क्रिकेट बोर्ड) चेअरमन असतो, तर मी खेळाडूंना स्वातंत्र्य दिले असते. संध्याकाळी साडेसाच नंतर मी त्यांना ऑस्ट्रेलियात म्हणालो असतो. जा तिथल्या संस्कृतीत मिसळा.’

किमान बीए (ग्रॅज्युएशन) पास होणे आवश्यक –

यावर रमीझ राजा यांनी अँकरला रोखले आणि म्हणाले, ‘नाही, नाही, एक सेकंद, एक सेकंद, पहिले अध्यक्ष होण्यासाठी त्याला किमान बीए (ग्रॅज्युएशन) पास होणे आवश्यक आहे.’ यावर अँकर आश्चर्य व्यक्त करत म्हणाले शोएब अख्तरचे ग्रॅज्युएशन पूर्ण नाही. या शोमध्ये रमीझ राजासोबत सकलेन मुश्ताकही स्पेशालिस्ट म्हणून उपस्थित होते.

हेही वाचा – IND vs AUS: तिसऱ्या कसोटीपूर्वी Shreyas Iyer ने इंग्रजी गाण्यावर धरला ठेका; पाहा मजेदार VIDEO

भारतीय संघातील खेळाडूंकडून शिकले पाहिजे –

१९९२ च्या विश्वचषक विजेत्या पाकिस्तान संघाचा सदस्य असलेल्या रमीझ राजाने शोएब अख्तरला फटकारले. ते म्हणाले की, तुम्ही भारतीय संघातील खेळाडूंकडून शिकले पाहिजे. राजा म्हणाले की, टीम इंडियामध्ये कोणतीही समस्या असली, तरी सुनील गावसकर लोकांसमोर राहुल द्रविडवर टीका करणार नाहीत. माजी पीसीबी अध्यक्षांनी असेही म्हटले की शोएब अख्तरने मर्यादेत राहून आपली विधाने करावीत.