पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष रमीज राजा यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आले आहे. तेव्हापासून ते नवे अध्यक्ष नजम सेठी यांच्यावर सातत्याने निशाणा साधत आहेत. रमीज राजा यांनी नजम सेठी यांच्यावर घराणेशाही आणि पक्षपाताचा आरोपही केला आहे. याआधीही एका मुलाखतीदरम्यान त्यांनी नजम सेठी यांना पीसीबी अध्यक्ष बनवणे ही राजकीय खेळी असल्याचा आरोप केला होता.

पाकिस्तान टीव्ही चॅनल जिओ सुपरवरील संभाषणादरम्यान, रमीज राजा म्हणाले, “जर तुम्ही या महान खेळाला पुरेसा आदर दिला नाही तर भविष्य खूप अंधकारमय होणार आहे. काही व्यवस्था नीट चालू दिली जात नाहीत. तसेच घराणेशाही आणि राजकारणाच्या मदतीने ते देशासाठी क्रिकेट चालवायला येतात हे अजिबात योग्य नाही.”

रमीज राजा पुढे म्हणाले, ”कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही हे आधी समजून घ्यायला हवे? तुम्ही संविधानच बदलले आहे. क्रिकेटच्या खेळात नॉन-क्रिकेटरची काय गरज आहे. यावर चर्चा व्हायला हवी. हे आमचे मैदान आहे आणि आम्हाला काय करायचे ते माहित आहे. क्रिकेटला चालवण्यासाठी आम्हाला कुबड्यांची गरज नाही. जसे हे सध्याचे प्रशासन करत आहे.”

हेही वाचा – फुटबॉल चाहत्यांसाठी गुड न्यूज! रोनाल्डो, मेस्सी तीन वर्षांनंतर आमनेसामने; सामन्याच्या गोल्डन तिकीटाची किंमत पाहून बसेल झटका

राजा पुढे म्हणाले, “पाकिस्तानची विजयाची टक्केवारी ६० पेक्षा जास्त होती, जी जगातील तिसरी सर्वोत्तम होती. चाहत्यांच्या व्यस्ततेच्या (Fan Engagement) बाबतीत आम्ही नवीन रेकॉर्ड तयार करण्यात यशस्वी झालो. पाकिस्तानसाठी एक वर्ष हा सुवर्णकाळ होता. पूर्वी कोणताही मोठा संघ यायचा नाही, पण आता ते बदलले आहे. आम्हाला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील सर्वोत्तम संघांपैकी एक मानले जात असे.”

Story img Loader