पाकिस्तानी क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक-फलंदाज उमर अकमल याच्यावर मॅच फिक्सिंगमध्ये आढळल्याप्रकरणी बंदीची कारवाई करण्यात आली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या शिस्तपालन समितीचे प्रमुख फैजल इ मिरान चौहान यांनी त्याला तीन वर्षांच्या बंदीची शिक्षा ठोठवली. या काळात त्याला क्रिकेटची संबंधित कोणत्याही गोष्टीत सहभागी होता येणार नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सोमवारी क्रिकेटपटू उमर अकमलला मॅच फिक्सिंग प्रकरणात दोषी ठरवत त्याच्यावर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधील तीन वर्षांच्या बंदीची कारवाई केली. अकमलच्या विरोधात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची शिस्तपालन समिती तपास करत होती. त्याच अंतर्गत त्याची चौकशीदेखील केली गेली होती. या तपासाअंती त्याला मॅच फिक्सिंग प्रकरणी दोषी ठरवण्यात आले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या प्रसिद्धी विभागाने अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करून उमर अकमलवरील कारवाईची माहिती दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा