राणी रामपालच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाने, न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या सामन्यात धडाकेबाज विजयाची नोंद केली आहे. कर्णधार राणी रामपालने झळकावलेल्या दोन गोलच्या आधारावर भारताने या सामन्यात ४-० ने विजय मिळवला. राणीव्यतिरीक्त शर्मिला आणि नमिता टोपो यांनीही एक-एक गोल झळकावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

न्यूझीलंड दौऱ्यावर आलेला भारतीय महिला संघ, ३ सामने न्यूझीलंडविरुद्ध आणि एक सामना इंग्लंडच्या संघाविरुद्ध खेळणार आहे. दोन्ही संघांना मध्यांतरापर्यंत गोल करता आले नाहीत. अखेरीस राणी रामपालने तिसऱ्याी सत्रात पेनल्टी कॉर्नरवर गोल झळकावत भारताचं खातं उघडलं. यानंतर भारतीय महिलांनी सामन्यात मागे वळून पाहिलच नाही. एकामोगामाग एक हल्ले चढवत भारतीय महिलांनी आपली आघाडी ४-० ने वाढवली. न्यूझीलंडच्या महिलांनी अखेरच्या सत्रात काही सुरेख चाली रचल्या, मात्र त्यांचे सर्व प्रयत्न फोल ठरले.