भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका सुरु असल्यामुळे साऱ्या क्रिकेटप्रेमींचे लक्ष त्या मालिकाकडे लागले आहे. पण या दरम्यान, देशांतर्गत क्रिकेट स्पर्धंमध्येही नवे चेहरे विक्रम प्रस्थापित करत आहेत. मध्य प्रदेशचा सलामीचा फलंदाज अजय रोहेरा याने शनिवारी हैदराबादविरुद्धच्या रणजी सामन्यात पदार्पणात नाबाद २६७ धावांची खेळी करीत विश्वविक्रम नोंदविला.
Madhya Pradesh has declared the innings. Ajay Rohera on first-class debut is 267 unbeaten.#RanjiTrophy#MPvHyd
— Mohandas Menon (@mohanstatsman) December 8, 2018
अजय या खेळीमुळे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पदार्पणात सर्वाधिक धावा करणारा क्रिकेटपटू बनला. या आधी हा विक्रम मुंबईच्या अमोल मुजुमदार याच्या नावावर होता. अमोलने १९९४ मध्ये पदार्पणात हरियाणाविरुद्ध २६० धावा केल्या होत्या. अजयने या खेळीदरम्यान ३४५ चेंडूं खेळले आणि नाबाद २६७ धावा काढल्या. त्याच्या या खेळीत त्याने २१ चौकार व ५ षट्कार खेचले.
Madhya Pradesh’s 21-year-old opener Ajay Rohera has just set a new cricket world record!
He is batting on 261 against Hyderabad @ Indore on his first-class debut!
He bettered the 260 by Mumbai’s Amol Muzumdar vs Haryana at Faridabad in 1994.#RanjiTrophy#MPvHyd— Mohandas Menon (@mohanstatsman) December 8, 2018
दरम्यान, या खेळीच्या जोरावर मध्य प्रदेशने हैदराबादविरुद्ध चार बाद ५६२ धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर मध्य प्रदेशच्या गोलंदाजांनी हैदराबादचा दुसरा डाव १८५ धावांत गुंडाळत आणि संघाला १ डाव २५३ धावांनी विजय मिळवून दिला.