तब्बल ४१ वेळा रणजी क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबईची यंदाच्या हंगामात अतिशय खराब सुरुवात झालेली आहे. यंदाच्या हंगामात आतापर्यंत मुंबईला एकही निर्णयाक विजय मिळवता आलेला नाहीये. त्यामुळे उपांत्यपूर्व फेरीसाठी आपलं आव्हान कायम राखायचं असल्यास मुंबईला सौराष्ट्राविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवणं गरजेचं बनलेलं आहे. दुखापतीमुळे संघाबाहेर गेलेल्या धवल कुलकर्णीला सौराष्ट्राविरुद्ध सामन्यात संघात जागा मिळालेली आहे. या सामन्यातही सिद्धेश लाड मुंबईचं नेतृत्व करणार आहे.

सौराष्ट्राविरुद्ध सामन्यासाठी असा असेल मुंबईचा संघ –

सिद्धेश लाड (कर्णधार), श्रेयस अय्यर, धवल कुलकर्णी, आदित्य तरे, एकनाथ केरकर, शिवम दुबे, जय बिस्ता, आकाश पारकर, विक्रांत औटी, शुभम रांजणे, कर्श कोठारी, ध्रुमिल मटकर, रोस्टन डायस, मिनाद मांजरेकर, तनुष कोटियन

Story img Loader