रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात विदर्भ संघ मुंबईविरूध्द कडवी झुंज देत होता. एका क्षणासाठी मुंबईपासून जेतेपद दूर जाते की काय असे वाटतं होते. पण सातत्याने केलेल्या प्रयत्नानंतर अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या तनुष कोटीयनने संघाला विकेटसह दिलासा मिळवून दिला. मुंबईला बराच काळ विकेट मिळवण्यात अपयश येत होते खरे पण तनुषने प्रयत्न नाही सोडले. विजयानंतर तनुष कोटीयन याला त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले.

मुंबईने रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीत विदर्भासमोर धावांचा डोंगर उभारला होता. जवळपास पाच सत्रे आणि १२९ षटकांनंतर विदर्भाने लक्ष गाठण्याचे धाडस दाखवले. मुंबईने दिलेल्या ५३८ धावांचा पाठलाग करताना विदर्भाने शेवटच्या दोन सत्रात पाच गडी राखून २०५ धावांपर्यंत मजल मारली. कर्णधार अक्षय वाडकरने खणखणीत शतक झळकावले आणि त्याच्या प्रत्येक धावेसह मुंबईच्या गोटात ताण वाढत होता. सामन्यानंतर कोटीयन म्हणाला “अज्जू भाई (अजिंक्य रहाणे), डीके भाई (धवल कुलकर्णी) हे दोघेही आम्हाला सतत संयम ठेवायला सांगत होते, पण ते सोपे नव्हते.”

Vijay Hazare Trophy Maharashtra Haryana Karnataka and Vidarbha qualify for the semi finals 2024-25
Vijay Hazare Trophy : महाराष्ट्रासह ‘या’ चार संघांनी उपांत्य फेरीत मारली धडक! जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
IND W vs IRE W Jemimah Rodrigues century helps Indian womens team register highest ODI score against Ireland
IND W vs IRE W : जेमिमा रॉड्रिग्जच्या पहिल्यावहिल्या शतकाच्या जोरावर भारताने घडवला इतिहास, केला ‘हा’ खास पराक्रम
Ravindra Jadeja too go out If Varun Chakravarty Gets Picked Aakash Chopra on Champions Trophy 2025 Squad
Champions Trophy 2025 : ‘या’ फिरकीपटूमुळे रवींद्र जडेजा चॅम्पियन्स ट्रॉफी संघातून होणार बाहेर? माजी भारतीय खेळाडूचं मोठं वक्तव्य
Devdutt Padikkal smashes hundred in quarterfinal against Baroda in Vijay Hazare Trophy 2025
Vijay Hazare Trophy : १५ चौकार अन् २ षटकार… देवदत्त पडिक्कलची शतकी खेळी बडोद्यावर पडली भारी
Rashid Khan 11 Wickets career best helps Afghanistan register series win vs Zimbabwe Ramat Shah Century
AFG vs ZIM: रशीद खानची कारकिर्दीतील सर्वाेत्कृष्ट गोलंदाजी, ११ विकेट्स घेत अफगाणिस्तानला असा मिळवून दिला मालिका विजय
Border-Gavaskar Trophy India defeat against Australia sport news
‘डब्ल्यूटीसी’तील आव्हानही संपुष्टात
IND vs AUS 5 Big Reasons Why India Failed to Retain Border Gavaskar Trophy Against Australia
IND vs AUS: भारतीय संघावर १० वर्षांनी का ओढवली बॉर्डर गावस्कर ट्रॉफी गमावण्याची नामुष्की? वाचा भारताच्या पराभवाची कारणं

घड्याळाचा काटा १ वर पोहोचला अन् तो क्षण मुंबईसाठी सामन्याला कलाटणी देणारा ठरला. कोटियनने टाकलेला शानदार चेंडू वाडकरने लेग साइडने खेळण्याचा प्रयत्न केला पण कनेक्ट होऊ शकला नाही आणि चेंडू स्टंपसमोर गुडघ्याच्या खाली असलेल्या पॅडवर आदळला.

हेही वाचा Ranji Trophy 2024: मुंबईच्या रणजी जेतेपदाचं मेकिंग ऑफ: अलूरमधील १५ दिवसांचे शिबिर, सरावसत्र, गाणी-डान्स, ४६ बैठका

ही विकेट म्हणजे मुंबईला जीवदान देणारी ठरली आणि अर्ध्या तासातच विदर्भचा उर्वरित संघ झटपट ड्रेसिंग रूममध्ये परतला. २०१५-१६ मध्ये शेवटची रणजी ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबईने १६९ धावांनी विजय मिळवून ४२वे विजेतेपद पटकावले. कोटियानमुळे मुंबईच्या संघाला सामन्यावर आपली पकड अधिक मजबूत करता आली. भारतीय सुपरस्टार्सच्या नेतृत्त्वाखाली संघात मैदानातील मुलांनीच महत्त्वाच्या भूमिका बजावल्या होत्या. ज्यांच्यामुळे गुरुवारी सुमारे दशकभरानंतर मुंबईला रणजी ट्रॉफी जिंकण्यात मदत झाली.

मालिकावीर तनुष कोटीयन

चेंबूरमध्ये लहानाचा मोठा झालेला कोटियन, उडुपी येथील क्रिकेट पंचाचा मुलगा. लहानपणापासूनच यार्ड्समध्ये बसून क्रिकेटची स्वप्ने पाहत होता. ओव्हल, क्रॉस आणि आझाद मैदानात कडाक्याच्या उन्हात धुळीने माखलेल्या पांढऱ्या पोशाखात उन्हात उभ्या असलेल्या हजारो मुलांप्रमाणे, कोटियनच्या करियरमध्ये गाइल्स शील्ड आणि हॅरिस शिल्ड या प्रसिध्द शालेय स्पर्धांमध्ये तो खेळला, याच स्पर्धांनी त्याचा क्रिकेटचा भक्कम पाया रचला.

मराठमोळा तुषार देशपांडे

रणजीच्या या मोसमात त्याचा साथीदार होता तो म्हणजे तुषार देशपांडे. मुंबईच्या सकाळच्या गर्दीतील एक भाग होणारा. लोकल ट्रेनमधून कल्याणपासून ५० किमी प्रवास करून शिवाजी पार्कमध्ये हजेरी लावणारा. अनेक वर्षांपूर्वी एका दिवशी सकाळी देशपांडे १२ वर्षांखालील संघाच्या निवड चाचणीसाठी एक फलंदाज म्हणून उपस्थित होता. त्याने पाहिलं की गोलंदाजांची रांग खूपच छोटी आहे. म्हणून चतुराईने तो तिथे जाऊन उभा राहिला. आपल्या क्रिकेट कारकिर्दीला दिशा मिळावी म्हणून तो त्याचं पहिल प्रेम म्हणजेच फलंदाजी सोडण्यास तयार होता.

क्रिकेटपटू घराणं असलेला मुशीर खान

वडिल नौशाद खान यांच्या नेतृत्वाखाली क्रिकेटचं सर्वकाही असलेल्या कुटुंबात जन्मलेल्या मुशीर खानसाठी अशी कोणतीही समस्या नव्हती. मुशीर खानचा भाऊ सरफराज खान यानेही नुकतेच भारतासाठी कसोटीमध्ये पदार्पण केले. रणजी करंडक उपांत्यपूर्व फेरीपूर्वी, तरूण मुशीरला तामिळनाडूचा उंच फिरकीपटू साई किशोरच्या गोलंदाजीसाठी तयारी करावी लागली. मुशीरच्या वडिलांनी २-३ विटा ठेवल्या आणि त्यांच्या वर उभे राहिले आणि तासभर त्याला गोलंदाजी करत होते.

या तिघांची कहाणी मुंबई क्रिकेटचं सार आहे. तुषारने परिस्थिती ओळखून बदल केला. मुशीरने कठीण गोलंदाजांचा सामना करण्यासाठी क्लृप्ती लढवली तर तनुष हा शिस्तबद्ध प्रक्रियेतून तयार झालेला खेळाडू. मुंबईच्या कानाकोपऱ्यातून येऊन या तिघांचे मार्ग एकत्र झाले. गौरवशाली परंपरा असलेल्या मुंबईसाठी खेळणं हे एक दडपणरुपी आव्हान आहे आणि त्याचवेळी अभिमान वाटावा अशी संधी.

रणजीच्या अंतिम सामन्यातील पाच दिवसांत, सुनील गावसकरपासून रवी शास्त्री, दिलीप वेंगसरकर ते सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्मापर्यंत, संघाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईला जेतेपद मिळवून देणाऱ्या दिग्गजांनीही उपस्थिती लावली होती.

मुंबईला रोखण्यासाठी आपल्या कौशल्यपूर्ण फंलदाजीचे प्रदर्शन घडवणारा विदर्भाचा कर्णधार वाडकर आणि त्याच्या संघाला माहित होते की ते फक्त एका संघाविरुद्ध नाही तर क्रिकेटचा वारसा लाभलेल्या एका संस्कृतीसमोर उभे ठाकले आहेत. “मुंबई हे क्रिकेटचे माहेरघर आहे. इथे प्रत्येक गल्लीबोळ्यात लोक हा खेळ खेळतात. त्यामुळे मुंबईत येऊन खेळणं विशेष आहे. खूपच खास आहे,” असे अक्षय वाडकर म्हणाला.

मुंबईने अनेक प्रसिद्ध विजेतेपदाच्या मोहिमा पाहिल्या आहेत परंतु यंदाचा विजय हा खूप सुखद आहे. कारण, हा विजय अशा वेळी आले आहे जेव्हा मुंबईकडून खेळणारे अनेक शिलेदार हे राष्ट्रीय स्तरावर आपल्या देशातचे प्रतिनिधित्त्व करत आहेत. भारतीय संघात जवळपास १० मुंबईचे खेळाडू आहेत. कसोटीपासून ते पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटपर्यंत आणि अगदी भारत ‘अ’ संघ ज्या संघातून जिथे तुषार देशपांडे अलीकडेच खेळताना दिसला. कसोटी क्रिकेटमधील सलामीची जोडी रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल हे दोघेही मुंबईचे आहेत. कोटियन आणि देशपांडेसह आता मुंबईला बॅटसह १० आणि ११ व्या क्रमांकावरही उत्कृष्ट फलंदाजी करणारे दोन हिरे गवसले आहेत.

हेही वाचा: Ranji Trophy 2024: ‘धवल’ कारकीर्दीची तळपती अखेर

मुंबईला त्यांच्या या हिऱ्यांनी यंदाच्या मोसमातील वेगवेगळ्या टप्प्यांवर महत्त्वपूर्ण योगदान दिले. पण यासाठी संघाला बरीच मेहनतही घ्यावी लागली. उदाहरणार्थ, संघ सुरुवातीपासून जैस्वालशिवाय होता आणि त्यांचा दुसरा स्टार फलंदाज सरफराज खान याला राष्ट्रीय संघातून बोलवणे आल्यानंतर हंगामाच्या मध्यभागी त्यांना संघातून बाहेर जावे लागले. तर शिवम दुबे दुखापतीमुळे बाहेर पडला.

भारतीय संघातील स्टार शार्दुल ठाकूरने विजेतेपदाच्या सामन्यात मोठी भूमिका बजावली.त्यासोबतच पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे आणि अखेरच्या टप्प्यात आलेल्या श्रेयस अय्यरचा विजयात मोठा वाटा होता. संघातील महत्त्वाच्या खेळाडूंचं फॉर्मात नसणं आणि काही कारणांस्तव महत्त्वाचे खेळाडू संघात नसणं ही मुंबईसाठी प्रतिकूल परिस्थिती होती. पण ही परिस्थिती मैदानातील इतर खेळाडूंना संधी देत त्यांनी सावरली.

मोहित अवस्थी, ज्याने मोसमातील पहिल्याच सामन्यात आपल्या वेगवान गोलंदाजीच्या जोरावर बिहारला धुळीस मिळवले किंवा विश्वासू शम्स मुलानी ज्यांने गोलंदाज म्हणून आपली प्राथमिक भूमिका कर्तव्यदक्षपणे पार पाडत बॅटने महत्त्वपूर्ण खेळी केली. संघाला गरज असताना त्याने आपल्या बॅटची चमक दाखवली.

मुशीर अंडर-१९ विश्वचषकानंतर संघात सामील झाल्यापासून एक महत्त्वाचा भाग झाला. त्याने १०० पेक्षा जास्त सरासरीने धावा केल्या आणि चेंडूनेही महत्त्वपूर्ण योगदान दिले. चौथ्या दिवसाच्या शेवटी करुण नायरची विकेट संघासाठी महत्त्वपूर्ण ठरली आणि मग देशपांडे आणि कोटियन ही वेगवान आणि फिरकी गोलंदाजी जोडी होती, ज्यांनी मैदानात पाय रोवून उभ्या असलेल्या फलंदाजांना परतीचा रस्ता दाखवला.

या मोसमात मुंबईच्या तरूणांनी त्यांच्या कारकिर्दीतील उत्कृष्ट खेळी केल्या. पण मैदानातील एका दांडगा अनुभव असलेल्या खेळाडूने शेवटची विकेट घेत संघाला विजयश्री मिळवून दिला. मुंबईचा स्टार गोलंदाज धवल कुलकर्णीने मुंबईसाठी अखेरचा सामना खेळत उमेश यादवला क्लीन बोल्ड केले आणि संघाचा दीर्घ विजेतेपदाचा दुष्काळ संपवला. कुलकर्णीने वयाच्या १८व्या वर्षी संघाचा भाग असताना त्याच्या पदार्पणाच्या हंगामात मुंबईच्या विजेतेपदासाठी मोठी भूमिका बजावली होती.

Story img Loader