Ranji Trophy 2021-22 : २०२१-२०२२ या रणजी करंडक हंगामातील उपांत्य फेरीची सुरुवात मंगळवारी, १४ जून रोजी होणार आहे. पहिला सामना पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेशदरम्यान तर दुसरा सामना मुंबई आणि उत्तर प्रदेशदरम्यान रंगणार आहे. हे दोन सामने अनुक्रमे अलूर येथील कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर आणि बंगळुरूमधील जस्ट क्रिकेट अकादमीच्या मैदानावर खेळवले जातील.
रणजी करंडकाच्या उपांत्य फेरीतील दोन्ही सामने सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी सुरू होणार आहेत. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर आणि डिस्न प्लस हॉटस्टारवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण बघता येणार आहे.
उपांत्यपूर्व फेरीत बंगालने झारखंडला पहिल्या डावातील मोठ्या आघाडीच्या बळावर पराभूत केले होते. निकाल न लागलेला नसलेला हा एकमेव उपांत्यपूर्व सामना होता. त्यापूर्वी, मुंबईने उत्तराखंडचा ७२५ धावांनी पराभव करत विक्रम रचला होता. तर, मध्य प्रदेशने पंजाबवर १० गडी राखून आणि उत्तर प्रदेशने कर्नाटकवर पाच गडी राखून मात केली होती.
उपांत्य फेरीतील संघ
पश्चिम बंगाल : अभिमन्यू इस्वरन (कर्णधार), अभिषेक पोरेल, आकाश दीप, रितीत चॅटर्जी, सुदीप चॅटर्जी, नीलकंठ दास, अभिषेक दास, सुदीप कुमार घरामी, हबीब गांधी, करण लाल, अनुस्तुप मजुमदार, सायन मोंडल, मुकेश कुमार, इशान पोरेल, प्रदिप्ता प्रामाणिक, गीत पुरी, अभिषेक रमण, ऋत्विक रॉय चौधरी, काझी सैफी, शाहबाज अहमद, मनोज तिवारी.
मध्य प्रदेशः आदित्य श्रीवास्तव (कर्णधार), रजत पाटीदार, अनुभव अग्रवाल, अक्षत रघुवंशी, अर्शद खान, पुनीत दाते, यश दुबे, गौरव यादव, मिहीर हिरवाणी, सारांश जैन, कुमार कार्तिकेय, हिमांशू मंत्री, ईश्वर पांडे, रमीजा खान, अजय रोहेरा, पार्थ सहानी, कुलदीप सेन, शुमहम शर्मा, राकेश ठाकूर, पृथ्वीराज सिंह तोमर, आवेश खान, व्यंकटेश अय्यर.
मुंबई: तनुष कोटियन, पृथ्वी शॉ (कर्णधार), अमन हकीम खान, अरमान जाफर, शशांक अत्तर्डे, मोहित अवस्थी, यशस्वी जयस्वाल, सर्फराज खान, धवल कुलकर्णी, शम्स मुलाणी, सिद्धार्थ राऊत, प्रशांत सोळंकी, हार्दिक तामोरे, आदित्य तारे, अर्जुन तेंडुलकर, रॉयस्टन डायस, शिवम दुबे, आकर्षित गोमेल.
उत्तर प्रदेशः जसमेर धनखर, ध्रुव जुरेल, आर्यन जुयाल, कुलदीप यादव (कर्णधार), अल्मास शौकत, ऋषभ बन्सल, प्रियम गर्ग, हरदीप सिंग, माधव कौशिक, पार्थ मिश्रा, अक्षदीप नाथ, अंकित राजपूत, शानू सैनी, समर्थ सिंग, समीर चौधरी, रिंकू सिंग, यश दयाल, झीशान अन्सारी, करण शर्मा, शिवम मावी, शिवम शर्मा.